शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

अडीच वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

By सदानंद सिरसाट | Updated: November 24, 2023 15:09 IST

तसेच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सदानंद सिरसाट, खामगाव (बुलढाणा): अडीच वर्षीय चिमुकलीला १७ वर्षीय नराधमाने खाऊचे आमिष दाखवत तिच्यावर पडक्या घरात अत्याचार केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील एका गावात गुरुवारी दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून नराधमावर बोराखेडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

बोराखेडी पोलिस स्टेशन हद्दीतील गावात समाजमन सुन्न करणारी ही घटना घडली आहे. कायद्याच्या दृष्टीने विधिसंघर्षग्रस्त असलेल्या १७ वर्षीय नराधमाने बालिकेला वासनेची शिकार बनविले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षीय चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून नराधमाने तिला उचलले. त्या चिमुकलीचा तो नेहमी लाड करीत असल्याने त्याच्यावर कुणाला संशय आला नाही. मात्र, दीड तास होऊनही मुलगी घरी आली नाही, त्यामुळे तिची शोधाशोध करण्यात आली. त्यानंतरही मुलगी सापडली नाही. शेवटी गावातील एका जुन्या पडक्या घरातून मुलीच्या रडण्याचा आवाज आला. तिच्या नातेवाईकांसह शेजाऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी ती रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. डोक्याला व शरीराला ठिकठिकाणी मार लागला आहे. शरीरातून रक्तस्राव होत असल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचे आढळून आले. मुलीला तातडीने बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी तातडीने आरोपी नराधमाला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी