शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाख शेतकर्‍यांना मिळणार लाभ

By admin | Updated: July 19, 2014 00:54 IST

कृषी संजीवनी योजना : बुलडाणा जिल्ह्यातील १५ उपविभागात अंमलबजावणी.

बुलडाणा : दुष्काळ, अतवृष्टी व गारपिटीसारख्या अस्मानी आपत्तींमुळे उदध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी वीज बिलांच्या थकबाकीत सवलत देणारी ह्यकृषी संजीवनी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १५ उपविभागातील १ लाख ३0 हजार ७५ शेतकर्‍यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. यामुळे शेतीपंपाच्या थकीत वीज देयकातील व्याज व विलंब आकारामध्ये सवलत मिळणार आहे.या योजनेतंर्गत कृषी ग्राहकांना ३१ मार्च २0१४ पयर्ंतच्या थकबाकीतील मूळ रकमेतून ५0 टक्के सवलत मिळणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना थकबाकीच्या मूळ रकमेची ५0 टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरावी लागणार आहे. पहिला हप्ता किमान २0 टक्के ३१ ऑगस्टपयर्ंत, दुसरा हप्ता कमीत कमी २0 टक्के ३0 सप्टेंबरपयर्ंत आणि उरलेली रक्कम ३१ ऑक्टोबरपयर्ंत भरायची आहे. कर्जमाफी व व्याजमाफीसारख्या योजनांचा नेहमी थकबाकीदारांना फायदा होतो. मात्र, नियमितपणे वीज बिल व कर्ज भरणार्‍यांना कोणताच फायदा होत नाही. ही बाब कृषी संजीवनी योजनेत सवलत देताना लक्षात घेण्यात आली आहे. त्यामुळे ३१ मार्च रोजी कृषिपंपाची कुठलीही थकबाकी नाही त्या शेतकर्‍यांना पुढील सहा महिने ५0 टक्केच बिल भरावे लागणार असून ५0 टक्के रक्कम सरकार भरणार आहे. विज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता कि शोर शेगोकार यांनी या योजनेमुळे शेतकर्‍यांवरील थकबाकीचा बोजा कमी होईल तसेच थकबाकीची वसूली सुद्धा होईल, असे सांगून शेतकर्‍यांनी मार्च २0१४ चे पुर्ण वीज बिल संबधीत विज वितरणाच्या उपविभागीय कार्यालयात भरुन योजनेचा लाभ घेण्याचे अहवान केले आहे.उपविभाग            लाभार्थीबुलडाणा            ६९९३चिखली             १३४२६देऊळगावराजा     ९0१४धाड                  ७८0२जळगाव जा        ९0२७खामगाव(शहर)     ६४३खामगाव(ग्रामीण)  १३0९३लोणार                ७९६७मलकापूर            ६८६३मेहकर              १0६0६मोताळा             ११३५९नांदुरा                 ८७८१संग्रामपूर             ८७0५शेगाव                 २३२१सिंदखेडराजा        १२४७५