शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

अडीच लाख केशरी कार्डधारकांना फटका

By admin | Updated: July 22, 2015 23:37 IST

अन्न सुरक्षा योजनेतील गरिबांचे धान्य केले बंद; जिल्ह्यातील २ लाखावर केशरी कार्डधारकांना फटका.

बुलडाणा : अन्न सुरक्षा योजनेत समावेश न करण्यात आलेल्या राज्यातील तब्बल पावणेदोन कोटी केशरी कार्डधारक गरीब नागरिकांचे रेशनचे धान्य राज्य सरकारने बंद केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार केशरी कार्डधारकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून केशरी कार्डधारक नागरिकांना रेशन दुकानातून माफक दरात गहू, तांदूळ मिळालेले नाही. एकीकडे महागाई व साठेबाजीमुळे धान्याचे भाव वाढत आहेत. आता नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. असे असताना राज्य सरकारने आपल्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी गरिबांचे धान्य बंद करून त्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न केला आहे. बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्येत २८ लाख एवढी असताना यापैकी १५ लाख ४0 हजार नागरिक अन्न सुरक्षा योजनेत सहभागी करण्यात आले होते. या नागरिकांना दोन रुपये किलो प्रमाणे गहू व तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ दिला जातो तसेच स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणारे जिल्ह्यात २ लाख ६६ हजार ९२८ हे एपीएल म्हणजे केशरी कार्डधारक आहेत. या केशरी कार्डधारक (एपीएल) नागरिकांनाही स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाने गहू व तांदूळ असे एकूण १५ किलो धान्य देण्याची योजना सुरू केली होती; मात्र यामुळे शासकीय तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याचे कारण पुढे करून केशरी कार्डधारकांना मिळणारे रेशनचे धान्य बंद करण्यात आले आहे. गत काही महिन्यांपासून केशरकार्डधारकांना धान्यवाटप बंद आहे. शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयाबाबत अद्यापही आदेश प्राप्त झालेला नाही. पुरवठा विभागाकडून आदेश प्राप्त होताच त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी पी. के. सुरडकर यांनी स्पष्ट केले. आर्थिक ताण वाढणार शासकीय त्रुटींमुळे अनेक नागरिकांचा बीपीएलमध्ये व अन्न सुरक्षा योजनेत समावेश होऊ शकलेला नाही, अशा केशरी कार्डधारक (एपीएल) नागरिकांनाही स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाने ७.२0 रुपये प्रतिकिलो दराने १0 किलो गहू व ९.६0 रुपये प्रतिकिलो दराने पाच किलो तांदूळ असे एकूण १५ किलो धान्य देण्याची योजना सुरू केली होती. स्वस्त दरात मिळणार्‍या या धान्यामुळे एका कुटुंबाचा महिनाभराचा धान्यावरील खर्च कमी होऊन इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तोच पैसा कामी येत होता. शासनाच्या या निर्णयामुळे आता केशरी कार्डधारक कुटुंबांचा आर्थिक ताण वाढणार आहे.