शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

लोणार तालुक्यातील सात गावात हायड्रोकार्बन शोधाच्या दृष्टीने प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 14:41 IST

लोणार : हायड्रोकार्बनच्या शोधाच्या दृष्टीने लोणार तालुक्यात लवकरच सर्व्हे सुरू होत असून तालुक्यातील जवळपास आठ गावांच्या शेतशिवारामध्ये त्या दृष्टीने प्रयत्न होणार आहे.

लोणार : हायड्रोकार्बनच्या शोधाच्या दृष्टीने लोणार तालुक्यात लवकरच सर्व्हे सुरू होत असून तालुक्यातील जवळपास आठ गावांच्या शेतशिवारामध्ये त्या दृष्टीने प्रयत्न होणार आहे. २०२२ पर्यंत कच्च्या तेलाची देशात दहा टक्के आयात कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे प्रयत्न आहे. त्याचा एक भाग म्हणून हायड्रोकार्बन मिळण्याच्या संभाव्यते बाबत कृष्णा-गोदावरी खोर्यात सध्या शोध घेण्यात येत आहे.लोणार तालुक्यातील  येवती, बिबखेड, तांबोळा, हत्ता, हिवराखंड, ब्राम्हणचिकना, खापरखेड, महारचिकना, खळेगाव ही गावे यासाठी निश्चित करण्यात आली असल्यची माहिती आहे. महसूल आणि वनविभागाचे उपसचिव यांनी यासंदर्भात लोणार तहसिल कार्यालयाला याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार देशातील गाळयुक्त अज्ञात खोर्यामध्ये हायड्रोकार्बन साठ्यांची शक्यता तपासण्याच्या दृष्टीने हा सेस्मीक सर्व्हे (हायड्रोकार्बनचा शोध घेण्यासंदर्भातील प्रक्रिया) करण्यात येत आहे.  तेल व नैसर्गिक वायू महामंडळातंर्गत हे काम होत आहे.लोणार तालुक्यातील जमिनीखाली पेट्रोलियम पदार्थांचे साठे सापडू शकतात. त्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निर्देशानुसार गोदावरी खोर्याचा भाग असलेल्या लोणार तालुक्याच्या पट्टयात त्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. या जमिनीखालील खडकांचे नमूने गोळा करण्यास सुरूवात झाली आहे.

७० टक्के तेलाची आयातदेशात ७० टक्के खनीज तेलाची आयात आज घडीला केली जाते. २०२२ पर्यंत यामध्ये दहा टक्क्यांनी घट करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुषंगाने देशातील ज्या भागात यापूर्वी असे सर्व्हे झाले नाहीत त्या भागात त्याचा शोध घेऊन देशांतर्गत तेलसाठे शोधण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचाच हा एक भाग आहे. सोबतच स्वच्छ इंधनाचे स्त्रोत म्हणून नैसर्गिक वायूला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सिमेंट, खत, स्टील उद्योगात इंधन म्हणून नैसर्गिक वायूचा वापर शक्य आहे, अशी माहिती भाजपा तालुका सरचिटणीस  प्रकाश माधवराव नागरे यांनी दिली.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवर