लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : खामगाव येथून २0 लाखांच्या रुई गठाणी भरलेला ट्रक नियोजित ठिकाणी न पोहोचविता चालक पसार झाला. या प्रकरणी फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबाद येथील कैलासनगर भागात राहणारे नंदू जनार्दन देवकते (वय ४८) यांनी ज्योती ट्रान्सपोर्ट येथून ट्रक क्रमांक एम.एच. ४३ वाय ७८0४ भाड्याने घेत, या ट्रकमध्ये खामगाव येथील जनुना रस्त्यावर असलेल्या अंकुर कोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड येथून २८ मे रोजी संध्याकाळी रुईच्या १00 गठाणी १९ लाख २८ हजार २५९ रुपये किमतीच्या भरून नियोजित ठिकाणी पाठविण्यासाठी ट्रक रवाना केला होता. मात्र, ३ जूनपर्यंत गठाणी ठरविलेल्या ठिकाणी न पोहोचविता नंदू देवकते यांची फसवणूक केली. या आशयाची फिर्याद ३ जून रोजी रात्री नंदू देवकते रा. औरंगाबाद यांनी शिवाजीनगर खामगाव पोलीस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ट्रक चालकाने केल्या २0 लाखांच्या गठाणी लंपास!
By admin | Updated: June 5, 2017 02:27 IST