सिंदखेडराजा: तालुक्यातील दत्तापुर येथील उपसरपंच राजू सोनलाल पवार हे पत्नीसह अपघातात जागीच ठार झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद नजीक असलेल्या चिंचोली गावाजवळ १८ मे रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.राजू पवार(३५) व त्यांच्या पत्नी शोभा (३०) हे दोघे दुचाकीने एका लग्न सोहळ्यासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदनकडे दुचाकीवर जात होते. दरम्यान जाफ्राबाद नजीक चिंचोली गावाजवळ वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परची व त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली. ही धडक एवढी जबर होती की राजू पवार व त्यांची पत्नी या धडकेत जागीच ठार झाले. त्यांच्या डोक्यातील हेल्मेटही अक्षरश: चुरा झाले होते. या घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी अनेकांनी धाव घेतली. पोलिसांनीही घटनास्थळी जावून कायदेशीर कारवाई पूर्ण केली. जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. राजू पवार हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर उपसरपंच पदावर विराजमान झाले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, आई वडील असा परिवार आहे.
भरधाव टिप्परने दुचाकीस उडविले, दाम्पत्याचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 17:01 IST
Accident News : राजू पवार(३५) व त्यांच्या पत्नी शोभा (३०) हे दोघे दुचाकीने एका लग्न सोहळ्यासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदनकडे दुचाकीवर जात होते.
भरधाव टिप्परने दुचाकीस उडविले, दाम्पत्याचा जागीच मृत्यू
ठळक मुद्देटिप्परची व त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली. राजू पवार व त्यांची पत्नी या धडकेत जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी अनेकांनी धाव घेतली.