शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

सिंचन विहिरी अडकल्या तांत्रिक अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:41 IST

बुलडाणा : धडक सिंचन विहीर योजनेतील जवळपास ९५२ विहिरी या तांत्रिक अडचणीत अडकल्या असून, त्या आता पूर्ण होणे जवळपास अशक्य असल्याचे चित्र आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १६ हजार ९00 पैकी १३ हजार ५४७ विहिरी पूर्णत्वास गेल्याने शेतकर्‍यांना शाश्‍वत सिंचनाचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देमुदतवाढीचा पाठवला प्रस्ताव जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : धडक सिंचन विहीर योजनेतील जवळपास ९५२ विहिरी या तांत्रिक अडचणीत अडकल्या असून, त्या आता पूर्ण होणे जवळपास अशक्य असल्याचे चित्र आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १६ हजार ९00 पैकी १३ हजार ५४७ विहिरी पूर्णत्वास गेल्याने शेतकर्‍यांना शाश्‍वत सिंचनाचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात २0१0 मध्ये १६ हजार ९00 विहिरी करण्यास धडक सिंचन योजनेंतर्गत मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी जवळपास तीन हजार विहिरींची कामे रखडलेली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव २0१५ मध्ये पाठविण्यात आला होता. यापैकी एक हजार ६६७ विहिरी पुर्णत्वास गेल्या आहेत, तर वर्तमानात रखडलेल्या सुमारे ३00 विहिरींसाठी नव्याने मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी जवळपास ४२ कोटी सात लाख ९३ हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. ७२ कोटी ९७ लाख ५0 हजार रुपयांचा निधी बुलडाणा जिल्ह्यास या कामासाठी मिळाला होता.

९५२ विहिरी ठरताहेत डोकेदुखीधडक सिंचन योजनेंतर्गत ९५२ विहिरी प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे ज्या शेतजमिनीत या विहिरी घेण्यात येणार होत्या, त्या जमिनीच संबंधितानी विकल्याच्या किंवा तांत्रिकदृष्ट्या तेथे विहीर घेणे शक्य नसणे तर विहीर बांधण्याचा मानसच संबंधित लाभार्थ्यांनी बदलल्यामुळे जिल्हा परिषद सिंचन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत या विहिरी येत असल्या तरी त्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही जिल्हा परिषद सिंचन विभागाकडे आहे. 

३00 विहिरींचा प्रश्न मार्गी लागणार!गेल्या सात वर्षांपासून धडक सिंचन विहीर योजना जिल्ह्यात सुरू आहे. २0१५ मध्ये नव्याने मुदतवाढ घेत दोन हजार ९१९ विहिरींची कामे सुरू करण्यात आली होती. त्यापैकी वर्तमान स्थितीत ३00 विहिरींची कामे बाकी असल्याने त्यांच्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. 

सिंचन अनुशेष मोठाबुलडाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा असल्याने धडक सिंचन विहिरींतर्गत शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातच सिंचनाचा एक शाश्‍वत मार्ग उपलब्ध होत असल्याने या योजनेवर राज्य शासनाने जोर दिला होता. बुलडाणा जिल्ह्याच दृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे.  एकटा जिगाव प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास बुलडाणा जिल्ह्याचा नव्हे तर अमरावती विभागाचा सिंचन अनुशेष दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच झाल्यास महत्तम ३१ सिंचन क्षेत्राच्या आसपास जिल्हा पोहोचेल; मात्र प्रदीर्घ कालावधीपासून या प्रकल्पाचेही काम रखडलेले आहे. त्यामुळे या सिंचन विहिरी शेतकर्‍यांसाठी मोठा आधार ठरणार्‍या आहेत.