शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्री उत्सवातून साधला त्रिवेणी संगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 14:26 IST

महाशिवरात्रीच्या पावणपर्वावर शिवनामस्मरणही होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महाशिवरात्री उत्सवातून मेहकर तालुक्यातील मोळी येथील शिवमंदिरात त्रिवेणी संगम साधला आहे. येथे अखंड हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायणासोबत शिवपुराण कथेचाही जागर होत आहे. महाशिवरात्रीच्या पावणपर्वावर शिवनामस्मरणही होत आहे.वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्व आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. महाशिवरात्रीला शिवपुराण कथेलाही मोठे धार्मिक महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात धार्मिक सामूहिक उपासना असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण आणि श्री शंकराची महती सांगणारी शिवपुराणक कथा एकाच व्यासपीठावर सुरू आहे. १५ फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रम जिल्ह्यातील शिव मंदिरामध्ये सुरू आहेत. मेहकर तालुक्यातील मोळी येथील शिवमंदिरामध्ये शिवपुराणचा जागर सुरू आहे. २१ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री असून त्यानिमित्त शिवमंदिरात शिवनामस्मरणही होणार आहे. जिल्ह्यात शिवमंदिरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामध्ये हेमाडपंती मंदिरांचाही समावेश आहे. या शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या पर्वावर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मेहकर तालुक्यातील मोळी येथे यंदा महाशिवरात्री महोत्सवामध्ये सदाशिव महाराज वाघमारे हे शिवपुराण कथा वाचण करीत आहेत. तर ज्ञानेश्वरी पारायण वाचक शेषराव महाराज हे आहेत. धार्मिक उत्सवामध्ये असा त्रिवेणी संगम जुळण्याला मोठे महत्त्व आहे. या कार्यक्रमासोबतच मोळी येथे विष्णूसहस्त्रनाम, कीर्तनसेवाही पार पडत आहे. महाशिवरात्रीनिमित्त सायंकाळी गावातून शंकराची मिरवणूक काढण्यात येईल व २२ फेब्रुवारीला महाप्रसादाचे वाटप होईल. संगीतमय कथेने आणली रंगतशिवमंदिर मोळी येथे शिवपुराण कथा सुरू आहे. यामध्ये संगितमय कथा असल्याने भाविकांना आणखी आनंद मिळत आहे. संगित शिवपुराण कथेला श्रोतेवर्गही वाढल्याचे आयोजकांनी सांगितले.

महिला भजनी मंडळाची साथमहाशिवरात्री महोत्सवामध्ये महिला भजनी मंडळ शिवचंद्र मोळी यांनी चांगली साथ दिली आहे. भजनी मंडळामुळे मातृशक्तीचा जागर येथे पाहावयास मिळाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMahashivratriमहाशिवरात्री