शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

त्रिकोणी लढतीची चिन्हं, विकासाच्या मुद्यांना बगल!

By admin | Updated: June 12, 2014 20:52 IST

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंजक ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.

जळगाव : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी त्रिकोणी लढतीची शक्यता असल्याने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंजक ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे प्रतापराव जाधव यांना जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात जवळपास २६ हजाराचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे या मतदारसंघात भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचे मानले जाते. आपल्या कार्यकाळात पाणीपुरवठा योजनेसारखी केलेली कामं घेऊन, ते निवडणूक मैदानात उतरण्याची तयारी करीत असताना, इतर पक्षांमध्ये मात्र उमेदवारीसाठीच रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ऐनवेळी उमेदवारी जाहीर करणे, ही काँग्रेसची प्रथाच असून, त्यामुळे उमेदवाराचे आणि पर्यायाने पक्षाचेही नुकसान होते. यावेळीही काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची यादी मोठी आहे. कुणालाही उमेदवारी जाहीर झाली की, अन्य नेते काँग्रेसचे अन्य इच्छुक उमेदवार जीव ओतून काम करीत नाहीत. सध्या रामविजय बुरुंगले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, अंजलीताई टापरे, डॉ. एस.के.दलाल, जिल्हा परिषद सदस्य सौ. ज्योतीताई टापरे, संजय उमरकर हे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी शर्यतीत आहे. २00९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रामविजय बुरुंगले हे तिसर्‍या क्रमांकावर होते. त्यांना ४३ हजार २२0 मते मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या विरोधात छुप्या पद्धतीने काम केले होते. याशिवाय बुंरुगले यांचे नाव जळगाव व संग्रामपूर तालुक्यासाठी नवीन होते. यावेळी तशी परिस्थिती राहणार नाही, हे खरे; मात्र त्यांना उमेदवारी मिळते की नाही, हे मात्र निश्‍चित नाही. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे महत्वाचे राहणार आहे. गत निवडणुकीत भारिप-बमसंचे प्रसेनजीत पाटील यांनी दुसर्‍या क्रमांकाची, ४५ हजार १७७ मतं मिळवून पक्षाला उभारी दिली होती. केवळ चार हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यांना उमेदवारी मिळाली तर निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनसेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनीही रणशिंग फुंकले आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, तर ती भाजपसाठी अडचणीची राहणार आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर जळगाव जामोद काँग्रेसकडे आहे. जागा वाटपादरम्यान जळगाव जामोद मतदारसंघ स्वत:कडे घेण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असले, तरी प्रत्यक्षात तसे होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या पक्षाच्या इच्छुक उमेदवार डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर यांना प्रतिक्षाच करावी लागण्याची शक्यता आहे.या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत जातीय समीकरणांचाच प्रभाव राहीला आहे. २00४ च्या निवडणुकीत पाटील समाजाचा प्रभावी उमेदवार नसल्याने, या समाजाने भाजपचे डॉ.कुटे यांना यांच्या विजयासाठी हातभार लावला. २00९ च्या निवडणुकीत माळी समाजाचा सशक्त उमेदवार नसल्याने, या समाजानेही भाजपलाच पाठिंबा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही समाजाचे नेमके कोणते उमेदवार मैदानात उतरतात, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. माजी आ. स्व. तुळशिरामजी ढोकणे यांचे पुत्र प्रकाश ढोकणे यांची भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची इच्छा आहे; मात्र भाजपकडून त्यांना सध्यातरी फारसा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत नाही. प्रत्येक निवडणुकीत विकासाच्या मुद्दे बाजुला पडल्याचे चित्र पहावयास मिळते. यंदाची निवडणूकही विकासाच्या मुद्यावर होते की, पुन्हा जातीय समिकरणंच प्रभावी ठरतात, यावरही बरंच काही अवलंबून राहणार आहे.