शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड मोहिमेस खामगावात तिलाजंली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 13:04 IST

सर्वत्र १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा गाजावाजा सुरू असतानाच, खामगावातील नटराज गार्डन परिसरात एक सप्तपर्णीवृक्ष धराशाही करण्यात आले.

ठळक मुद्दे पालिका प्रशासनासोबतच इतर कोणत्याही विभागाची परवानगी न घेता, सप्तपर्णी वृक्ष तोडण्यात आले. त्यानंतर ताबडतोब या वृक्षाची लाकडे घटना स्थळावरून गायब करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. सप्तपर्णी वृक्ष तोडण्यात आल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या ठिकाणी पेव्हर्सही बसविण्यात आले.

खामगाव: हिरवळ वाढविण्यासाठी शासनस्तरावर मोठ्याप्रमाणात वृक्षलागवड मोहिम सुरू करण्यात आली आहे. सर्वत्र १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा गाजावाजा सुरू असतानाच, खामगावातील नटराज गार्डन परिसरात एक सप्तपर्णीवृक्ष धराशाही करण्यात आले. पुरावा नष्टकरण्यासाठी हा वृक्ष रातोरात गायबही करण्यात आला. याप्रकरणी पालिका, शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

खामगाव शहरातील नटराज गार्डन परिसरात गेल्या दोनतीन दिवसांपूर्वी पालिका प्रशासनासोबतच इतर कोणत्याही विभागाची परवानगी न घेता, सप्तपर्णी वृक्ष तोडण्यात आले. त्यानंतर ताबडतोब या वृक्षाची लाकडे घटना स्थळावरून गायब करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. सप्तपर्णी वृक्ष तोडण्यात आल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या ठिकाणी पेव्हर्सही बसविण्यात आले. याप्रकरणी नगर पालिका प्रशासनासोबतच शहर पोलिसांमध्येही तक्रार दाखल करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येते.  एकीकडे वृक्ष लागवडीसाठी नगर पालिका प्रशासनाची लगबग सुरू असतानाच, दुसरीकडे वृक्षतोडीसारख्या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या जात असल्याची ओरड होत आहे.

पर्यावरणाचा ºहास!

पालिका प्रशासनाकडून १३ कोटी वृक्ष लागवडीला हातभार म्हणून नगर पालिका परिसरात वृक्ष लागवड केली जात आहे. काही सामाजिक संघटनाच्यावतीनेही वृक्ष लागवड मोहिमेला हातभार लावण्यात येत आहे. मात्र, काही नागरिकांकडून पर्यावरणाचा ºहास करण्यात येत असल्याचे चित्र शहरात दिसून येते.

पालिकेकडे अद्याप तक्रार प्राप्त नाही.  तक्रार प्राप्त होताच यासंदर्भात कारवाई प्रस्तावित केली जाईल.

- शंकर नेहारे, वृक्षाधिकारी, नगर परिषद, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावNatureनिसर्ग