शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राजूर घाटात आज यात्रा!

By admin | Updated: March 7, 2016 02:26 IST

महाशिवरात्री निमित्त रामेश्‍वर मंदिरात भक्तांची मांदियाळी.

मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील राजूर येथील भक्तांची मनोकामना पूर्ण करणार्‍या श्री रामेश्‍वर महादेव मंदिरात महाशिवरात्री महोत्सवानिमित्त दोन दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेला हजारो भाविकांची गर्दी होत असते. सन १९५0 ते ५५ या काळात या मंदीराचा जीर्णोद्धार करण्यात आला. हे स्थान अतिप्राचीन असून, या मंदिराच्या वास्तूची जडणघडण तेराव्या शतकातील आहे. हे मंदिर हेमाडपंथी असून, त्याचे काळ्या पाषाणातील अवशेष आजही तिथे पाहावयास मिळतात. या मंदिराचा जीर्णोद्धार दिवंगत स्वामी आत्मानंद सरस्वती महाराज (रा.खंडवा), दिवंगत विनायकराव केशवराव सूर्यवंशी (बुलडाणा), दिवंगत नारायण गंगाराम उदयकार (राजूर), दिवंगत धनजी शिवनाथ शर्मा (बुलडाणा) यांच्या हस्ते करण्यात आला. सन १९६२ मध्ये या मंदिराच्या न्यासाची नोंदणी करण्यात आली. जीर्णोद्धारानंतर होमहवन व महाप्रसादाच्या कार्यक्रमाला संत गाडगे महाराज उपस्थित होते. बुलडाणा येथील भाविकांना या मंदिरावर दर्शनाकरीता येताना अजिंठा घाटातून यावे लागत असल्याने त्यांना दर्शनासोबत पर्यटनाचा आनंदसुद्धा उपभोगता येतो. श्री रामेश्‍वर महादेव मंदिर हे स्थान राजूर येथील नळगंगा या नदीच्या संगमावर वसले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ७ मार्च रोजी महाशिवरात्री यात्रा येथे होत आहे. त्यानिमित्त पहाटेपासून अभिषेक व दर्शनास सुरुवात होईल. सकाळ ते सायंकाळपर्यंत अखंड दर्शनबारी सुरू राहणार आहे. हे स्थान जागृत असून, भक्तांच्या मनोकामना, इच्छा या महादेवाच्या मंदीरात पूर्ण होतात, असे येथे दर्शनास येणार्‍या भक्तांचे कथन आहे. दुपारी १२ वाजता मंदिर संस्थानतर्फे आरती व घंटानाद होईल. दिवसभर मंदिरात भजनांचा कार्यक्रम सर्वांंचा आनंद द्विगुणीत करणार आहे. मंदिराच्या दक्षिण भागातल्या शेतात यात्रा भरत असते. शासनाने राजूर येथील या रामेश्‍वर मंदिरास पर्यटनस्थळाचा दर्जा दिला असून, त्या अनुषंगाने विविध सुविधांची कामे पूर्ण केली आहेत. येथील दर्शनाने भक्तांची मनोकामना पूर्ण होत असल्याच्या अख्यायीकेने येथील भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.