शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन गरजेचे - विजय पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:22 IST

अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन होेणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजाला नवी दिशा मिळू शकते, असे मत आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांनी  ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.

- राजू चिमणकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजातील गरजू, होतकरू, अनाथांना आधार देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. याच भावनेतून पूर्वापार चालत आलेल्या रुढी, परंपरांना फाटा देत, त्या खर्चातून गरजू, होतकरू, अनाथांच्या चेहºयावर हास्य फुलवण्यासाठी  समाजात परिवर्तन होेणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजाला नवी दिशा मिळू शकते, असे मत आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांनी  ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.  

आत्मसन्मान फाउंडेशनच्या वाटचालीबद्दल काय सांगाल? राज्यातील ग्रामीण भागामध्ये लहान मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतल्या जात असताना त्यांच्या हाताला काम नव्हे तर त्यांच्या हाती पाटी देण्यासाठी आत्मसन्मान जागृत झाला. त्यानंतर सन २०११  पासून शिक्षण सहायता उपक्रमाने मुहूर्तमेढ रोवल्या गेली. पुढे संगणक साक्षरता अभियान, व्यसनमुक्त तरुण  अभियानालाही सुरुवात झाली.  व्यसनमुक्ती कार्याबाबत काय सांगाल?  तरुणाईला विविध व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. युवा पिढीमध्ये नवा विचार पेरण्यासाठी त्यांना वास्तविकतेची जाणिव करून देण्यात येत आहे. व्यसनाचा पैसा  वाचवून तो आपण समाजाच्या सत्कार्यासाठी देऊ शकतो, ही  भावना त्यांच्यात निर्माण होणे गरजेचे आहे. सध्या मुक्ताईनगर रोडवर व्यसनमुक्ती केंद्राचे बांधकाम सुरू आहे. येथे कार्यशाळा, शिबिराच्या माध्यमातून युवकांचे मन परिवर्तन करणे सुरू  आहे.   युवा पिढीला काय संदेश द्याल? इंटरनेटच्या जाळ््यात अडकलेल्या तरुणाईने समाजातील वास्तव जाणून घ्यावे. आपल्या वाढदिवसानिमित्त का होईना एक दिवस गरजू, निराधारांसोबत घालवावा. त्या जाणिव जागृतीमधून समाजात आदर्श नागरिक घडून, त्यांचे राष्टÑनिर्मितीमध्ये योगदान राहू शकते. समाजाला नवी दिशा देण्यासाठी तरुणांनी साध्या पद्धतीने लग्न करून विधायक कार्यासाठी पुढाकार घ्यावा.    

 राज्यभरात उपक्रम, व्यापक प्रतिसाद  शेतकरी कन्या, पुत्र अभ्यासिका सुरू करण्यात आली. यामध्ये स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. मनोरुग्णांना आधार मिळावा, यासाठी मन परिवर्तन समुपदेशन केंद्रही  सुरू करण्यात आले आहे. सर्वच समाजाचा विविध उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाजाची देण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे संस्थेचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बिड, नांदेड, विदर्भातील बुलडाणा, मोताळा, मलकापूर, जळगाव, बुलडाणा तसेच बोरीवली, मुंबई येथेही व्यापक प्रमाणात आत्मसन्मानाची चळवळ रुजली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत