शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास विभागाच्या बदल्यांमध्ये पश्चिम वऱ्हाडाला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 13:10 IST

अकोला जिल्ह्यात अनेक पदे रिक्त असताना त्या पदावर कोणताही अधिकारी या बदली प्रक्रीयेतून मिळाला नाही. 

खामगाव : ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र विकास सेवेतील गट अ पदांच्या २५ अधिकाºयांच्या  १० आॅगस्ट रोजी केलेल्या बदली प्रक्रीयेत अमरावती विभागाला ठेंगा दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अकोला जिल्ह्यात अनेक पदे रिक्त असताना त्या पदावर कोणताही अधिकारी या बदली प्रक्रीयेतून मिळाला नाही. चालू वर्षात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यातच अधिकारी-कर्मचाºयांच्या बदल्या केल्यास त्यांना प्रशासकीय बदलीचा खर्च देता येणार नाही, या कारणासाठी ३१ मे पर्यंत होणारी सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रीयाही पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १५ टक्क्यांच्या मर्यादेत विनंती बदल्या करण्याची सूट  देण्यात आली. तर महसूल व ग्रामविकास विभागातील अधिकाºयांच्या बदल्याही  करण्यात आल्या. शासनाच्या या बदली प्रक्रीयेत विदर्भातील रिक्त पदांवर अधिकारी मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यातून विदर्भात असलेले अधिकारीच इतरत्र गेले आहेत. तर अमरावती विभागातील जिल्ह्यांमध्ये ग्रामविकास विभागातील गट-अ मधील अधिकाºयांची  अनेक पदे रिक्त आहेत. त्या रिक्त पदांवरही  कोणाचीही नियुक्ती या बदली प्रक्रीयेत झाली नाही. त्यामुळे या बदली प्रक्रीयेत पश्चिम वºहाडाला ठेंगाच दाखवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. या बदल्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथून वाशिम मानोरा येथे एका गटविकास अधिकाºयाची बदली झाली आहे. तर नागपूर जिल्ह्यातून एकाची  अहमदनगर, अमरावती जिल्ह्यातील धामनगाव रेल्वेचे गटविकास अधिकारी देवळी येथे गेले. त्यांच्या जागेवर अमरावती येथून मग्रारोहयोचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयकाची  बदली  झाली  आहे. २५ अधिकाºयांच्या बदल्यांमध्ये विदर्भातून अधिकारी बाहेर गेले आहेत. कुणीही विदर्भात आले नाही. त्यातच अमरावती विभागात रिक्त पदांची संख्या मोठी  असताना त्या पदावरही अधिकारी न देता ती  रिक्त ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विदर्भातील समस्या कायमच राहणार आहेत.

टॅग्स :khamgaonखामगाव