शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या संदिग्ध

By admin | Updated: May 17, 2017 00:45 IST

शिक्षक सेनेचा आरोप : दिव्यांगत्वाबाबत स्पष्ट याद्या प्रसिद्ध करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबत शासन आदेशानुसार चिखली पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागातील बदलीपात्र शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार १२ मे रोजी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत; मात्र; या याद्या प्रसिद्ध करताना यामध्ये दिव्यांग शिक्षकांबाबत कोणत्याही प्रकारे स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याने, यावर आक्षेप घेण्यास अडचणी उद्भवल्या आहेत. याची दखल घेत शिक्षण विभागाने तातडीने दिव्यांग शिक्षकांच्या दिव्यांगत्वाचा प्रकार, दिव्यांगत्वाची टक्केवारी, प्रमाणपत्र काढल्याची तारीख आणि सेवापुस्तिकेत प्रमाणपत्राची नोंद या बाबीचा उल्लेख करून सदर यादी प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.याबाबत शिक्षक सेनेने गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पंचायत समिती कार्यालयात शिक्षण विभागात बदलीपात्र शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार १२ मे रोजी प्रसिद्ध याद्या दरवर्षी प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या नमुन्यामध्ये प्रसिद्ध न करता या यादीमध्ये जे शिक्षक दिव्यांग आहेत, त्यांच्या दिव्यांगत्वाचा प्रकार, दिव्यांगत्वाची टक्केवारी, प्रमाणपत्र काढल्याची तारीख आणि सेवापुस्तिकेत प्रमाणपत्राची नोंद केल्याची तारीख याबाबीचा उल्लेख नसल्याने दिव्यांग शिक्षकांना या यादीबाबत आक्षेप घेण्यास अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र शिक्षक सेनेने २७ फेब्रुवारी २०१७ शासन निर्णयानुसार १४ जानेवारी २०११ च्या शासन निर्णयाप्रमाणे योग्य नमुन्यात दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र जोडले आहे किंवा नाही, याबाबीचा समावेश यादीमध्ये करण्यात आलेला नाही, यादीमध्ये याबीबीचा समावेश करावा, ज्या दिव्यांगाची सेवा पुस्तिकेत प्रमाणपत्राची नोंद असून वयाची ५३ वर्षे पुर्ण झालेली आहेत त्यांच्या समोर दिव्यांगत्वाचा प्रकार व ५३ वर्षे पूर्ण असे नमूद करणे आवश्यक असताना तसे नमूद करण्यात आलेले नसल्याने सदरहू बाब यादीत नमूद करण्यात यावी, तसेच बुलडाणा पंचायत समितीने जी यादी प्रसिध्द केलेली आहे त्यामध्ये आंतरजिल्हा रूजु दिनांक व विषय क्र.३ प्रमाणे यादी प्रसिध्द केलेली असल्याने चिखली पंचायत समितीने देखील विषय क्रमांक १,२,३ व ४ नुसार यादी प्रसिध्द करावी आणि ज्यांनी दिव्यांग पालक म्हणून नोंद केलेली आहे त्यांच्या पाल्याची माहितीदेखील नमूद करण्यात यावी व सदर यादीमध्ये पाल्याचे नाव, शिक्षण, वय, विवाहित आहे किंवा नाही, त्यांचा दिव्यांगत्वाचा प्रकार, टक्केवारी, प्रमाणपत्र काढण्याची तारीख नमूद करून जे स्वत: दिव्यांग आहेत व पाल्यदेखील दिव्यांग आहेत त्यांची नोंद विषय क्रमांक ३ नुसार करण्यात यावी आदी मागण्या केल्या असून, खरे दिव्यांग शिक्षक व सामान्य शिक्षकांवर होणारा अन्याय आणि संभाव्य अनियमितता टाळण्यासाठी उपरोक्त सर्व बाबीच्या नोंदी करून यादी प्रसिध्द करण्यात यावी व यादी प्रसिध्द केल्यानंतर यावर आक्षेप घेण्यासाठी किमान २ दिवसांचा कालावधी देण्यात यावा, जेणेकरून खरे दिव्यांग शिक्षक व सामान्य शिक्षकांना आक्षेप घेणे सोयीचे होईल, अन्यथा याविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्यावतीने न्यायालयात जाण्याचा ईशारा देखील देण्यात आला आहे. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विनायक धोंडगे, तालुका संपर्क प्रमुख प्रभाकर वायाळ, तालुकाध्यक्ष देविदास बडगे, कार्याध्यक्ष उदयसिंह राजपूत, कोषाध्यक्ष शेख सैफुल्ला, सरचिटणीस भगवान पवार यांच्यासह सुमारे ७१ शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. खऱ्या दिव्यांगावर होत आहे अन्यायजिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या बदल्यांसदर्भाने शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी काढलेल्या नविन आध्यादेशानुसार शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांतील सुधारीत धोरणानुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग १ (दिव्यांग शिक्षक) यांना या बदली प्रक्रीयेतून सुट मिळणार आहे. वस्तुत: चिखली पंचायत समिती अंतर्गत कार्यरत एकूण शिक्षकांपैकी ४० टक्के शिक्षकांनी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर केलेले आहेत. यामध्ये अनेक शिक्षकांनी बदली प्रक्रीया तसेच सवलती व बढतीसाठी बोगस प्रमाणपत्र सादर केले असल्याने खऱ्या दिव्यांगावर अन्याय होवून त्यांच्या हक्क हिरावल्या जाणार असल्याने याबाबीची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे असताना; याकडे दूर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे बदलीपात्र शिक्षकांच्या प्रसिध्द याद्यांमध्येही दिव्यांग शिक्षकांबाबत पुरेशी माहिती न देता संदिग्ध याद्या प्रसिध्द केल्या असल्याने प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत