शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ९५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या स्थगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 11:06 IST

बुलडाणा जिल्हा परिषदच्या ९५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या स्थगीत करण्यात आल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्यात सर्वत्र जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे वारे सुरू आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर यंदा विनंती बदल्यांच्या सुचना शासनाने दिल्या होत्या. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बुलडाणा जिल्हा परिषदच्या ९५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या स्थगीत करण्यात आल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व माध्यमिक शिक्षकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.जिल्ह्यात गतवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गोंधळ झाल्याने अनेक शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच शिक्षकांना २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात होणाºया बदल्यांची प्रतीक्षा होती. शिक्षकांच्या बदल्यांसदर्भात राज्य शासनाच्यावतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षकांच्या बदल्या आॅफलाइन पद्धतीने करण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात आले होते. बदल्यांसाठी शिक्षकांची गर्दी होऊन कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासकीय बदल्या करणे योग्य नव्हते; त्यामुळे केवळ विनंती बदल्या शासनाने कराव्या, अशी मागणी शिक्षक संघटनांच्यावतीने करण्यात आली होती. दरम्यान, शासनाने शिक्षकांच्या विनंती बदल्यांना ‘ग्रीन सिग्नल’ दिला. जिल्ह्यात एकूण ९५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. परंतू कोरोनामुळे केवळ विनंती बदल्या करण्याबाबतचे पत्र आले. त्यामुळे बदल्यांची प्रक्रिया पुन्हा बदलली. त्याुनसार जिल्ह्यातील शिक्षकांनी विनंती बदल्याबाबतचे अर्जही शिक्षण विभागाकडे केले होते. परंतू ह्या बदल्या शासनाच्या नियमानुसार घेणे कोरोनामुळे शक्य नसल्याने बुलडाणा जिल्हा परिषदकडून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याच स्थगीत करण्यात आल्या. ह्या बदल्या आॅफलाइन होत्या, शिवाय यामध्ये शिक्षकांचे समुपदेशन घेणे आवश्यक होते.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या स्थगीत करण्यात आल्या आहेत. शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे. कोरोनाच्या धरतीवर गर्दी वाढेल आणि कोरोना विषाणूचा ससंर्ग वाढेल, त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार बदल्या करण्यास अडचणी असल्याकारणारे बदल्यांना स्थगीती देण्यात आली आहे.-एजाज खान, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक