लोकमत न्यूज नेटवर्कपळशी बु.: येथे १0 दिवस उलटून गेले तरीही भारतीय स्टेट बँक शाखेचा व्यवहार सुरळीत झालेला नाही. त्यामुळे बँक खा तेदारांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. खामगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर येत असलेल्या पळशी बु. येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा असून, पळशी बु., पळशी खुर्द, कदमापूर, लोणी (गुरव), दस्तापूर, संभापूर, उमरा, लासुरा, हिंगणा व शेंद्री या गावातील ग्रामस्थांचा या बँकेत आ िर्थक व्यवहार चालत आहे; मात्र १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३0 वाजताच्या दरम्यान या शाखेच्या टॉवरवर अचानक वीज कोसळल्याने बँकेतील यूपीएस मशीन व कॉम्प्युटर संचात बिघाड झाला. त्यामुळे १८ सप्टेंबरपासून या बँकेचे कामकाज बंद आहे. गेल्या १0 दिवसांपासून बँकेचे यूपीएस मशीन व कॉम्प्युटर संच दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे १0 ते १२ दिवसांपासून बँक खातेदारांचे आर्थिक व्यवहार हे बंद झाल्याने पैशांचे काही काम पडल्यास दुसर्याकडे जाऊन उसनवारीची भीक मागण्याची पाळी येथील खातेदारांवर येऊन ठेपली आहे. अनेक खा तेदारांकडे एटीएम कार्ड नाही. तरी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी बँक ग्राहकांची होत असलेली गैरसोय दूर करण्याकरिता त्वरित बँकेचे बिघाड झालेल्या संचाची दुरुस्ती करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी येथील बँक खातेदारांकडून केली जात आहे.
दहा दिवस उलटूनही बँकेचे व्यवहार ठप्पच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:22 IST
पळशी बु.: येथे १0 दिवस उलटून गेले तरीही भारतीय स्टेट बँक शाखेचा व्यवहार सुरळीत झालेला नाही. त्यामुळे बँक खा तेदारांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
दहा दिवस उलटूनही बँकेचे व्यवहार ठप्पच!
ठळक मुद्देस्टेट बँकेचे ग्राहक त्रस्त१७ सप्टेंबर रोजी शाखेच्या टॉवरवर कोसळली होती वीजवीज कोसळल्याने बँकेतील यूपीएस मशीन व कॉम्प्युटर संचात बिघाड