शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पारंपारीक घोंगडी निर्मिती व्यवसायाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:25 IST

सिंदखेड राजा: हातमागावर घोंगडी तयार करण्याची मातृतीर्थ सिंदखेड राजाची धनगर समाजाची कला आज लूप्त होण्याच्या मार्गावर आहे

- काशिनाथ मेहेत्रेसिंदखेड राजा: हातमागावर घोंगडी तयार करण्याची मातृतीर्थ सिंदखेड राजाची धनगर समाजाची कला आज लूप्त होण्याच्या मार्गावर आहे. सिंदखेड राजातील लघू उद्योग म्हणून या व्यवसायाकडे पूर्वी बघितले जायचे. एका दिवसात २० ते २२ घोंगड्यांची निर्मिती होणारा येथील व्यवसाय डबघाईस आला आहे. या व्यवसायाचे पुर्नरुजीवन करण्याची गरज आहे.  शहरामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाज बांधवांचा शेतीचा व्यवसाया  सोबत मेंढ्या पाळण्याचा जोडधंदा वडिलोपार्जीत होता. तर मेंढराच्या  लोकरपासून ते घोंगडी बनवीण्याचा लघु उघोग प्रत्येकाच्या  घरा-घरा समोर सुरु असल्याचे दिसत होते. परंतु जंगलावर मोठ्या प्रमाणात शेती काढली गेली पर्यायाने जंगल कमी होत गेली. धनगर समाजाचे हजारो मेंढ्याचे  कळप चरायाला जंगल नसल्या मुळे  कमी झाले. त्याच बरोबर घोंगडी या लघु उघोगाला उतरती कळा लागली असून युवकांनी त्या व्यवसाया कडे पाठ फिरवल्यामुळे  हा व्यवसाय बुडण्याच्या मार्गावर आहे.

 घोंगडीला मागणीच नाही!मेंढ्या पासून अनेक प्रकारचे फायदे  आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे मेंढ्याच्या केसापासून शहरात घोंगड्या बनवण्याचा लघु उघोग चांगल्या  प्रकारे चालत होता. पूर्वी पावसाचे प्रमाण चांगले होते. तेंव्हा लोक  पावसापासून संरक्षणासाठी  घोंगड्याचा वापर करायचे. अंगावर पीत्तआले व घोंगडी अंगावर घेऊन झोपले तर पीत्त नाहीसे होत असे. घोंगडीचा वापर प्रत्येकांच्या घरात होत होता. त्यामुळे घोंगडीला चांगली  मागणी सुध्दा होती. मात्र आता घोंगडीला मागणीच राहिली नाही. 

 शासनाने या उघोगासाठी  प्रोत्साहन  देण्याची गरजधनगर समाज बांधवांना या लघु उघोगातून प्रपंच चालविण्यासाठी चांगल्या  प्रकारची मदतच होत होती. हा व्यवसाय मेहणतीने समाज बांधव करत होते. परंतु मेंढरांची संख्या कमी झाल्याचा परिणाम या उद्योगाव झाला आहे. सध्या शहरात भिमराव पुंजाजी भोजने व त्यांचा मुलगा अर्जून भोजने  हे दोघेच घोंगडी बनवीण्याचे काम करत  असून शासनाने या उघोगासाठी  प्रोत्साहन  देण्याची गरज आहे. प्रोत्साहन दिल्यास बेरोजगारांना दिलासा मीळेल, अशी अपेक्षा घोंगडी बनविणाºयांनी व्यक्त केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजा