शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील ऐतिहासिक शांती महोत्सव खंडीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 10:21 IST

Khamgaon शांती महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती मोठी देवी शांती महोत्सव समितीचे अध्यक्ष उत्तमराव उमरकर यांनी दिली.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तब्बल एका शतकापेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेला शांती (जगदंबा, मोठी देवी) महोत्सव  कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने स्थगीत करण्यात आला आहे. त्यामुळे खामगावातील शांती,  भक्ती आणि शक्तीच्या उत्सवावर विरजण पडले आहे. तथापि, आता शासनाच्या परवानगीकडे खामगावातील भाविकांच्या नजरा लागून आहे.  संपूर्ण देशात केवळ खामगाव आणि परिसरात शांती महोत्सव साजरा होतो. कोजागिरी पोर्णिमेपासून पुढील ११ दिवस हा महोत्सव भक्तीभावाने पार पडतो. त्यामुळे या महोत्सवाची परिसरातील भाविकांना प्रतीक्षा असते.  देशाच्या कानाकोपºयातील भाविक येथे शांती महोत्सवात दर्शनासाठी आपल्या परिवारासह येतात.  मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे शांती महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती मोठी देवी शांती महोत्सव समितीचे अध्यक्ष उत्तमराव उमरकर यांनी दिली. असा आहे शांती महोत्सवाचा इतिहास  विजयादशमीला असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर, देवीचा चेहरा क्रोधीत असल्याने लाल झालेला असतो. त्यामुळे  म्हणून या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो. तसेच देवीला शांत करण्याकरीता पूजा, अर्चना, आराधना केली जाते. त्या उत्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते. जंगदबा उत्सव, मोठी देवी उत्सव केवळ खामगावातच साजरा होत असल्याने, या उत्सवाला वेगळे महत्व असून एक वेगळीच परंपरा हा उत्सव राखून आहे. श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने शहरातील जलालपुरा भागात अनेक वर्षापासून तर खामगाव शहरात सन १९०८ पासून  साजरा होणारा जगदंबा मातेचा उत्सव आता खामगाव शहर आणि परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. मोठी देवीचा बोधन ते खामगाव प्रवासआंध्रप्रदेशात निजामाबाद जिल्ह्यात बोधन  गाव आहे.  महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याच्या  सिमेनंतर आंध्र प्रदेशच्या सिमेस प्रारंभ होतो व सिमेपासून काही अंतरावर हरीद्रा नदी वाहते. या नदीच्या काठी मातेचे पूर्वी स्थान होते. कालांतराने ते बोधन गावच्या मध्यभागी मातेचे जागृत स्थान स्थायीक झाले. तेथूनच देवी खामगावात आली.   कै.कैरन्ना आनंदे हे लोहगाव येथील रहिवासी होते. बिड्याच्या व्यवसायाकरीता लागणाºया पानाच्या व्यवहाराकरीता बोधन येथे त्यांचे येण-जाणे राहायचे. त्यामुळे ते बोधनच्या मातेचे भक्त झाले. लोहगाव येथे मातेच्या मुर्तीची स्थापना करून उत्सव साजरा करत. कालांतराने त्यांनी खामगाव शहरात येऊन व्यवसाय सुरू केला. त्यानंतर खामगावात त्यांनी आपल्या स्वत:च्या बिडी कारखान्यातील सर्व जातीधर्माच्या कामगारांच्या सहाय्याने हा उत्सव सुरू केला.  हीच प्रथा पुढे सुरू आहे. शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा!नवरात्रोत्सवाला काही विशिष्ट अटींवर परवानगी नाकारण्यात आल्यावर खामगाव येथील मोठी देवी शांती महोत्सव मंडळानेही मोठी देवीचा महोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मंडळाचे अध्यक्ष उत्तमराव उमरकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे शांती महोत्सव तयार रद्द झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, या महोत्सवाला कोजागिरी पोर्णिमा म्हणजेच ३० तारखेपर्यंतचा अवधी आहे. त्यामुळे  शासनाच्या परवानगीची भाविकांना प्रतीक्षा असून ३० तारखेपर्यंत महोत्सवाला परवानगी मिळेल, अशी अनेकांना आशा आहे. 

 

टॅग्स :khamgaonखामगावIndian Traditionsभारतीय परंपराbuldhanaबुलडाणा