वरवट बकाल (बुलडाणा): शेतात काम करण्यासाठी महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने ५ जण गंभीर तर २0 जण किरकोळ जखमी झाले. ही घटना आज ७ ऑक्टोबर रोजी बोडखा-उकडगाव मार्गावर घडली. वानखेड येथील ३0 ते ४0 महिला बोडखा येथील शेतामध्ये निंदण करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीने सकाळी जात असताना अचानक ट्रॉलीचा तोल जावून पलटी झाली. यामध्ये ट्रॉलीतील ३0-४0 महिला खाली पडल्याने त्यांना दुखापती झाल्या. यामध्ये मंगला तायडे, माला धुरदेव, नंदा तायडे, सुनिता तायडे यांच्यासह पाच महिलांना जबर मार लागल्याने शेगाव व अकोला येथे रेफर करण्यात आले. तर उर्वरित मजुरांवर वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटली
By admin | Updated: October 7, 2014 23:17 IST