शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यात आढळले एचटीबीटीचे अंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:07 IST

HTBT News बियाणे नमुन्यात एचटीबीटी अंश सापडल्याने आता पर्यावरण कायद्यानुसार कारवाई करण्याचे पत्र तालुका कृषी अधिकारी जी. बी. गिरी यांनी दिले आहे. 

ठळक मुद्देनमुने बियाणे तपासणी प्रयोगशाळा नागपूर येथे पाठवले.

- सदानंद सिरसाट

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने प्रतिबंधित बियाण्याचा वापर रोखण्यासाठी खामगाव येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत उमरा येथे घेतलेल्या बियाणे नमुन्यात एचटीबीटी अंश सापडल्याने आता संबंधित आरोपी जगन्नाथ गणपत बगाळे, चालकावर पर्यावरण कायद्यानुसार कारवाई करण्याचे पत्र तालुका कृषी अधिकारी जी. बी. गिरी यांनी दिले आहे. दरवर्षी पेरणी केलेले बियाणे निकृष्ट निघाल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जातात. तसेच खतांमध्येही आवश्यक ते गुणवत्तेचे घटक नसल्याचेही तपासणीतून पुढे येते. त्याशिवाय, प्रतिबंधित बियाणे, किटकनाशकांची विक्री, साठा करण्याचेही प्रकार घडतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाच्या पथकांनी काटेकोरपणे तपासणी करण्याचा आदेश कृषी आयुक्तांनी दिला होता. तालुका कृषी अधिकारी गिरी यांना तालुक्यातील उमरा येथे दोन व्यक्तींकडून बियाणे विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी बोरजवळा शिवारात घटनास्थळावर वाहन क्रमांक एमएच-४६ बीक्यू-२२८७ मधून कापूस बियाण्यांची अनधिकृतपणे विक्री करीत असल्याचे पुढे आले. त्यावेळी गिरी यांनी पिंपळगाव राजा पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. सोबतच नमुने बियाणे तपासणी प्रयोगशाळा नागपूर येथे पाठवले. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आता आरोपींवर पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६ नुसार कारवाई करण्याबाबत पोलिसांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

बियाणे साठा जप्त, कंपन्यांची नावे अनभिज्ञ तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईच्या वेळी प्रीमिअम कॉटन हायब्रीड सिड्स कंपनीचे कापूस-आशा, विजय सिड्स साखरखेर्डाचे सोयाबीन जेएस-३३५, कंपनीचे नावे नमूद नसलेल्या कापूस एकेएच-०८१, चवळी-केेएस आढळून आली होती. त्यानुसार कारवाईसाठी पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेती