शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 11:50 IST

Towards Tuberculosis Eradication क्षयरोग उच्चाटनासाठी जिल्ह्यात १३ पथकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच क्षयरोगाचे दूरीकरण करण्यासाठी प्रयत्न वाढविण्याकरिता २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. वेळ निघून जात आहे, क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्याची असे यंदाच्या क्षयरोग दिनाचे घोषवाक्य आहे. त्यानुसार सध्या क्षयरोग उच्चाटनासाठी जिल्ह्यात १३ पथकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. संसर्गजन्य रोगामध्ये क्षयरोगाचा समावेश होतो. क्षयरोग उच्चाटनासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण १३ तालुक्‍याला १ असे १३ पथक आहेत व जिल्ह्यामध्ये एकूण २६ डी.एम.सी. मान्यताप्राप्त सूक्ष्मतादर्शक केंद्रे आहेत.  प्रत्येक क्षयरोग पथकाला एक वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक कार्यरत आहेत. व ५ ते ६ डी.एम.सी. साठी एक वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, सहा शहरी भागासाठी सहा टह.बी.एच.व्ही. कार्यरत आहेत. बुलडाणा येथे एक जिल्हा क्षयरोग केंद्र असून तेथे जिल्हा क्षयरोग अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, डी.पी.सी., डी.पी.एस, पी.पी. एम., डी.ई.ओ. लेखापाल, इत्यादी स्टाफ आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला अंदाजे शासकीय रुग्णालयातून १३० व खासगी डॉक्टरांकडून १२० असे एकूण अंदाजे २५० नवीन टीबीचे रुग्ण शोधून उपचारावर ठेवले जातात. 

क्षयरुग्ण शोधून शासकीय यंत्रणेला कळवल्यास प्रत्येक क्षयरुग्णामागे १००० रुपये डॉक्टरांना मिळतात. ५०० रुपये  प्रति महिना सर्व क्षयरुग्णांसाठी पोषक आहारासाठी दिले जातात. जागतिक क्षयरोग दिनाच्या निमीत्ताने वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २०२५ पर्यंत क्षयरोग नष्ट करण्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. मिलिंद जाधव, जिल्हा क्षयरोग अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य