शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानगंगा, लोणारमधील पर्यटन बंद; मार्गदर्शकांना धान्यवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 16:36 IST

गाईड म्हणून कार्यरत असलेल्या १४ जणांना मेळघाट व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानतर्फे राशन वाटप करण्यात आले.

बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या साथीचा फटका वन्यजीव विभागालाही बसला असून मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत येत असलेल्या वन्यजीव परीक्षेत्रातंर्गतचे पर्यटन ३० एप्रिल पर्यंत बंद करण्यात आले आहे. परिणामी या क्षेत्रात गाईड म्हणून कार्यरत असलेल्या १४ जणांना मेळघाट व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानतर्फे राशन वाटप करण्यात आले.काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातंर्गत असलेले एक गाईड, ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यामध्ये गाईडचे काम करणारे सात जण, लोणार वन्यजीव विभागातंर्गत काम करणारे सहा जण यांना हे राशन वाटप करण्यात आले आहे. ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन मुळे या अभयारण्य व वन्यजीव विभागातील पर्यटन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणा काम करणाºया गाईडचा (मार्गदर्शक) रोजगाराचा तथा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या एकूण १४ जणांना राशन वाटप करण्यात आले असून त्यात पाच किलो कणिक, दोन किलो तेल, एक किलो साखर, अर्धा किलो बेसन, एक किलो तरू डाळ, अर्धा किलो मुंग डाळ यासह जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप करण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वन्यजीव अधिकारी एम. एन. खैरनार यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
टॅग्स :buldhanaबुलडाणाlonar sarovarलोणार सरोवरdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्य