शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कुष्ठरोग निर्मुलनासाठी आजपासून ‘स्पर्श मोहीम’

By admin | Updated: January 30, 2017 03:28 IST

बुलडाणा जिल्ह्यात १३५ कुष्ठरूग्णांची नोंद

ब्रम्हानंद जाधवबुलडाणा, दि. २९- जिल्ह्यात १३५ कुष्ठरुग्णांची संख्या असून, त्यामध्ये ७८ पुरुष, ४९ महिला व आठ बालरुग्णांचा सामावेश आहे. या सर्व रुग्णांवर औषध उपचार करण्यात येत असून कुष्ठरोगाच्र्या समुळ उच्चाटनासाठी जिल्ह्यात ३0 जानेवारीपासून ह्यस्पर्श मोहीमह्ण सुरु करण्यात येणार आहे. कुष्ठरोग हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे. याचा परिणाम त्वचा, हातातील आणि पायातील परिघवर्ती चेता, नाकाची अंतत्वचा, घसा आणि डोळ्यावर होतो. चेतांच्या टोकावर परिणाम झाल्याने परिणाम झालेल्या भागाची संवेदना नष्ट होते. संवेदना नाहिशी झाल्याने हाता पायाची बोटे वाकडी होतात किंवा गळून पडतात. हात पाय विद्रूप होणे हे या रोगात प्रामुख्याने आढळते. पूर्वी १0 हजार लोकसंख्येमागे ६७ कुष्ठरोगी आढळून येत होते. कुष्ठरोग्यांचे हे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाला यश मिळत आहे. आता जिल्ह्यात १३५ कुष्ठरोगी असून हे प्रमाण 0.४६ टक्के म्हणजे २0 हजार लोकसंख्येमागे १ पेक्षाही कमी आहे. अलीकडच्या नोंदिनुसार शहरी भागात ५६ तर ग्रामीण भागात ७९ रुग्ण आहेत. त्यामध्ये ४९ महिला व बारा वर्षाच्या आतील आठ बाल रुग्णांचा सामावेश आहे. बुलडाणा तालुक्यात १५ रुग्ण, चिखली तालुक्यात १0 रुग्ण, देऊळगावराजा ६ रुग्ण, जळगाव जामोद १0 रुग्ण, खामगाव १५ रुग्ण, लोणार ४ रुग्ण, मलकापूर ११ रुग्ण, मेहकर २0 रुग्ण, मोताळा ९ रुग्ण, नांदुरा १२ रुग्ण, संग्रामपुर ७ रुग्ण, शेगांव १३ रुग्ण आणि सिंदखेडराजा तालुक्यात ३ कृष्ठरोग रुग्ण आहेत. कुष्ठरोग समुळ नष्ट करण्यासाठी व कुष्ठरोगाची भिती घालविण्यासाठी जिल्ह्यात स्पर्श मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज कुष्ठरोग निवारण दिनराष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीबरोबरच कुष्ठरोगांच्या सेवेला महत्वाचे स्थान देऊन कुष्ठरोग निर्मुलन कार्यात मोठे योगदान दिले. ३0 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतीथी आहे. हा दिवस कुष्ठरोग निवारण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. कुष्ठरोग निवारण दिनापासून जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने स्पर्श मोहिम बरोबरच विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. सर्वेक्षण होणार !६ ते १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील गावोगावी कुष्ठरुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील १0 दिवस उपचार केले जाणार आहेत.- जिल्ह्यात १३५ कुष्ठरोगी असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत उपचार केले जातात. कुष्ठरोग सहा महिन्यात बरा होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. -डॉ.के. एस. वासनिक,सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग, बुलडाणा.