शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

बुलडाणा जिल्ह्यातील तूर उत्पादकांवर दुष्काळाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:56 IST

बुलडाणा: जिल्ह्यात सध्या तूर कापणीचा हंगाम सुरू असून तूर उत्पादकांवर दुष्काळाचे ढग निर्माण झाले आहेत. यावर्षी एकरी अवघे एक क्विंटलपर्यंतच तूर उत्पादन होत असल्याने गतवर्षीपेक्षा चारपटीने उत्पादनात घट झाल्याचे दिसून येते.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्यात सध्या तूर कापणीचा हंगाम सुरू असून तूर उत्पादकांवर दुष्काळाचे ढग निर्माण झाले आहेत. यावर्षी एकरी अवघे एक क्विंटलपर्यंतच तूर उत्पादन होत असल्याने गतवर्षीपेक्षा चारपटीने उत्पादनात घट झाल्याचे दिसून येते. उत्पादन कमी झाल्याने भविष्यात तूर डाळीचीही टंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे. जिल्ह्यात तुरीचे सरासरी क्षेत्र ६५ हजार ५३ हेक्टर आहे. त्यामध्ये यावर्षी ८१ हजार ७७७ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. कृषी विभागाच्या खरीप हंगामातील नियोजीत क्षेत्रापैकी तब्बल १२६ टक्के क्षेत्रावर तुरीची पेरणी होऊनही भविष्यात तूर डाळीवर संक्रात येण्याची चिन्ह दिसून येत आहेत. खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पावसाने दिलेली दडी तूर पिकासाठी धोकादायक ठरली. यामध्ये सुरूवातील ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्यांनी आपल्या पिकांना पाणी देऊन वाचविले. मात्र बहुतांश शेतकºयांची तूर, सोयाबीन या पिकांना फटका बसला. सोयाबीनचे उत्पन्न थोडेबहुत हातात आले. परंतू तूर पीक दुष्काळाच्या कचाट्यात सापडले आहे. तूरीला पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी मिळू शकले नाही, त्यामुळे यावर्षी तूरीचे झाडे लवकरच वाळली. सध्या जिल्ह्यातील तूर पीक कापणीच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी तूर पीक कापूण शेतकºयांच्या घरात तूर आली आहे. मात्र एका एकरामध्ये तुरीचे जळपास एक क्ंिवटलपर्यंतच उत्पादन शेतकºयांच्या हातात येत आहे. गतवर्षी एका एकरामध्ये चार ते पाच क्विंटलपर्यंत तूर झाली होती. त्यातुलनेत यावर्षी एका क्विंटलच्यावरती उत्पादन जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे तुरीची पेरणी जास्त होऊनही उत्पादनात फटका बसल्याने तूर डाळीची कमतरता निर्माण होऊ शकते. 

पश्चिम विदर्भात १०२ टक्के तुरीचा पेराराज्यात तुरीचे सरासरी क्षेत्र १२ लाख ४७ हजार ४८७ हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे ९७ टक्के म्हणजे १२ लाख ९ हजार ९७९ हेक्टर क्षेत्रावर तूर पेरा आहे. तर पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात १०२ टक्के तुरीचा पेरा आहे. अमरावती विभागातील तुरीचे सरासरी क्षेत्र ४ लाख ११ हजार ४८६ हेक्टर क्षेत्र असून ४ लाख १८ हजार ४९६ क्षेत्रावर तुरीची पेरणी झालेली आहे. यात बुलडाणा जिल्ह्यात ८१ हजार ७७७ हेक्टर, अकोला ४७ हजार ३४२, वाशिम ४६ हजार २५५, अमरावती १ लाख १२ हजार ८१३, यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ३० हजार ३०९ हेक्टर क्षेत्रावर तूरीची पेरणी करण्यात आली होती. 

धुक्याचा तुर, हरभऱ्याला फटका मागील आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण व धुके पडल्याने तुरीसह हरभरा पिकाला मोठा फटका बसला. १९ डिसेंबर रोजी सकाळी धुक्याचे प्रमाण अत्यंत जास्त होते. यामुळे पिकांना मोठा धोका निर्माण झाला. अनेक ठिकाणी तुरीच्या शेंगा भरू शकल्या नाहीत. अत्यल्प पाऊस त्यात पुन्हा धुक्याचे संकट उत्पादनात घट होण्यास कारणीभूत ठरले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती