शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शेतात तुरीची सोंगणी; मात्र सातबाऱ्यावर होईना नोंदणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 14:57 IST

शेतात तुरीची सोंगणी सुरू झाली; परंतू अनेकांच्या सातबाºयावर नोंदच नसल्याने हमीभावाच्या नोंदणीला अडचणी येत आहेत.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तुरीचा हंगाम अंतीम टप्प्यात आला आहे. मात्र आतापर्यंत अनेक तलाठ्यांकडून सातबाºयावर तुरीची आॅनलाइन नोंदणीच करण्यात आलेली नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. सध्या तूर हमीभावाने विक्री करण्यासाठी आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. शेतात तुरीची सोंगणी सुरू झाली; परंतू अनेकांच्या सातबाºयावर नोंदच नसल्याने हमीभावाच्या नोंदणीला अडचणी येत आहेत.राज्यात खरीप हंगाम २०१९-२० मध्ये प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण योजनेंतर्गत किमान आधारभूत हमीभावाने तूर खरेदीची केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, त्यांची आर्थिक उन्नती साधावी, यासाठी शासनाकडून हमीभाव ठरवून दिलेला आहे. मागील वर्षी शेतकºयांकडील तूर व हरभरा शासनामार्फत हमीभावाने खरेदी करण्यात आला होता. यावर्षी तुरीचा आधारभूत दर ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल आहे. केंद्रशासनाने जाहीर केलेल्या आधारभूत दराने तुरीची खरेदी करण्यासाठी १ जानेवारीपासून आॅनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू झाली आहे.शेतकºयांची ज्या तालुक्यात जमीन आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर त्यांची नोंदणी सुरू आहे.नोंदणीकरीता आधारकार्डची छायांकित प्रत, तूर पिकांची नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड संलग्न असलेल्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, तलाठ्याचे पीक पेरा पत्र आदी कागदपत्र सादर करावे लागतात. नोंदणी झालेल्या शेतकºयांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येते. परंतू सध्या तूर खरेदी केंद्रावर सुरू असलेल्या आॅनलाइन नोंदणीसाठी विविध अडचणी निर्माण होत आहेत. त्यामध्ये प्रमुख्याने सातबारा उतारावर तूर पिकाची नोंद नसल्याने हमीभावाने तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी करणे अवघड झाले आहे.अनेक तलाठ्यांनी शेतकºयांच्या सातबाºयावर तूर पिकांची नोंद केलेली नसल्याचे प्रकार प्रत्येक तूर खरेदी केंद्रावर समोर येत आहेत. त्यामुळे शेतकºयांना नोंदणी न करताच परत जावे लागत आहे.

नोंदणीची मुदत महिन्याभरावरहमीभावाने तूर खरेदीसाठी १ जानेवारी २०२० पासून प्रत्येक तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी सुरू झाली असून, त्यासाठी १५ फेब्रुवारीची अंतीम मुदत देण्यात आली आहे. या महिन्याभरामध्ये सातबारावर पिकाची नोंद, तलाठ्याकडून पीक पेरा पत्र, बँक खात्याला आधार कार्ड संलग्न आदी बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती