शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

शौचालय स्वच्छता प्रकरण : पालकांवर दबाव; चिमुकला बालगृहात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 11:32 IST

Buldhana News : मारोड गावातील विलगिकरण कक्षाच्या शौचालयाची सफाई एका ८ ते १० वर्षाच्या चिमुकल्या मुलाकडून करून घेण्यात आली.

ठळक मुद्देगावातील काही राजकीय मंडळीकडून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु झाला.त्याला बुलडाणा येथे बाल समितीकडे सोपवण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : मारोड ग्रामपंचायतीच्या विलगीकरण केंद्रातील शौचालयाची स्वच्छता करून देणाऱ्या चिमुकल्याला शुक्रवारी बुलडाणा येथील बालगृहात दाखल करण्यात आले. गावातील काहींनी मुलाच्या पालकांवर दबाव आणणे सुरू केले होते. तर मुलाला बालगृहात दाखल करण्याची जबाबदारी पोलिसांची होती. त्यानुसार त्याला बुलडाणा येथे बाल समितीकडे सोपवण्यात आले.संग्रामपूर तालुक्यातील मारोड गावातील विलगिकरण कक्षाच्या शौचालयाची सफाई एका ८ ते १० वर्षाच्या चिमुकल्या मुलाकडून करून घेण्यात आली. याप्रकरणी तालुक्यातील बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेमधील काही कर्मचाऱ््यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या बाबत लोकमतने पाठपुरावा करून वृत प्रकाशित केले. त्यामध्ये तालुक्यातील प्रशासनाची बेफिकीर वृत्ती चव्हाट्यावर आणली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याविरुद्ध नायब तहसिलदार यांच्या तक्रारीनुसार तामगाव पोलिसांत बाल न्याय अधिनियम २०१५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेमुळे चिमुकल्याच्या पालकाला गावातील काही राजकीय मंडळीकडून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु झाला.याबाबत प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना ‘त्या’ चिमुकल्याच्या मामाने दबाव आणून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यासाठी मुद्रांक व स्वाक्षरी मागत आहेत, असे सांगितले.  मुलाला बुलडाणा येथील शासकीय मुलाचे निरीक्षण बाल गृह तथा बाल न्याय मंडळ येथे पालकांमार्फत बोलावून घेण्यात आले आहे. चौकशी समितीने त्या मुलाकडून माहिती घेतली. तसेच मुलाला बालगृहात दाखल करून घेतले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने, शेख अनिस, मुलाचे पालक उपस्थित होते. गेल्या पाच ते सहा दिवसापासून हे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. एक समितीही या प्रकरणात चौकशी करत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव