शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेगावात काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र

By admin | Updated: July 12, 2014 22:21 IST

काळाची गरज ओळखून भारॉकामध्ये झालेले दोन्ही गट एकत्र आल्याने पुन्हा भाराकाँची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेगाव : शेगाव नगराध्यक्ष पदावर येणार्‍या काळाची गरज ओळखून भारॉकामध्ये झालेले दोन्ही गट एकत्र आल्याने पुन्हा भाराकाँची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुठलेही नवे समिकरण नव्याने घडले नाही तर नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचे बंडूबाप्पू देशमुख विराजमान होतील यात शंका नाही. शेगाव नगर पालिकेत एकुण सदस्य संख्या २५ असून यामध्ये भारॉकाचे १0 भाजप, सेनेचे ९ तर नगरविकास आघाडीचे ६ सदस्य आहेत. सुरवातीला झालेल्या कराराप्रमाणे त्यावेळेस जळगाव जामोद विधानसभा क्षेत्राचे असलेले नेते रामविजय बुरुंगले आणि नगरविकास आघाडीचे सर्वेसर्वा ज्ञानेश्‍वरदादा पाटील यांनी भाजप सेना सत्तेवर होवू नये म्हणून भाराकाँची सदस्य संख्या १0 असल्यानंतरही आघाडीच्या गळ्यात माळ टाकून सुरवातीचे सव्वा वर्षे नगराध्यक्ष पद त्यांच्याकडे तर नंतरचे सव्वा वर्षे भारकॉकडे अशा प्रकारची युती अस्तीत्वात आली होती. यावेळेस रामविजय बुरुगले यांनी आपल्या १0 सदस्यांना विश्‍वासात घेवून पुढील सव्वा वर्षामध्ये बुरुंगले परिवार सदस्य नगराध्यक्ष पदावर बसणार नाही तर सर्व संमतीने आपण ज्याची निवड करणार तो मला मान्य राहणार अशी हमी दिली होती. परंतु आघाडीचे प्रथम सव्वा वर्षे संपल्यानंतर बुरुंगले यांनी आपले शब्द फिरवला, त्यामुळे भाराकाँ मध्ये असंतोष निर्माण होवून प्रमोद उर्फ बंडूबाप्पू देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये ६ जणांचा एक वेगळा गट तयार झाला व गटनेतेपदी बंडुबाप्पुची वर्णी लावण्यात आली. याचा परिणाम म्हणून स्थायी समित्यांच्या वेळेस २ समित्या बंडूबाप्पु गटाला तर दोन भाजप सेनेला मिळाल्या. आता नगराध्यक्ष पद हे ओबीसी असल्याने तसेच बंडूबाप्पू देशमुख हे भाराकॉचे जेष्ठ सभासद असल्याने त्यांनी यावेळी नगराध्यक्ष पदावर आपली दावेदारी प्रखरपणे मांडली. तर पक्षाचा नगरध्यक्ष बनत असल्याने पक्षाने काढलेला ह्यव्हीपह्ण वर बुरुंगले गटानेही स्वीकारला आहे. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडीवरुन बंडुबाप्पु यांची नगराध्यक्ष पदावर निवड ही जवळपास निश्‍चित समजल्या जात आहे. मात्र उपाध्यक्ष पदाचा घोळ कायमच आहे. कारण आतापर्यंंत बंडुबाप्पु गटाचे ह्यचाणक्य सारर्थीह्ण समजल्या जाणारे किरण बाप्पु देशमुख यांनी मोठे राजकारण उभे केले मात्र उपाध्यक्ष पदासाठी त्यांचीही कसरत होणार आहे.