शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:44 IST

बुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना  अंतर्गत शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अर्ज भरण्याचा २२ सप्टेंबर शेवटचा दिवस आहे.

ठळक मुद्देसर्व कर्जाची माहिती न दिल्यास अर्ज होणार अपात्रनव्याने अर्ज न भरताच जुन्या अर्जात एडीट ऑप्शनमधून माहिती द्यावीजिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद ऑनलाइन अर्जामध्ये करावी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना  अंतर्गत शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अर्ज भरण्याचा २२ सप्टेंबर शेवटचा दिवस आहे.    अर्ज न भरलेल्या शेतकर्‍यांनी त्वरित आपले सरकार केंद्र, महा-ई सेवा केंद्र व सीएससी केंद्रावर जावून अर्ज भरावेत. तसेच  कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकांकडील शेती कर्जाची माहिती द्यावी. ज्या शेतकर्‍यांनी विविध बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज खात्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. शेतकर्‍यांनी ज्या बँकेचे कर्ज घेतले आहे, त्या बँकेकडे आधार कार्ड व इतर माहिती सादर करावी. शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेव्यतिरिक्त इतर बँकांकडून कर्ज घेतले असले तरी त्यांना एकूण दीड लक्ष रुपयांपयर्ंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी शेतकर्‍यांनी जिल्हा बँक व इतर बँकेकडे आधार कार्ड आणि के.वाय.सी कागदपत्रे देणे आवश्यक आहे.  सदर माहिती भरण्यासाठी शेतकर्‍यांना नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून, त्याच अर्जामध्ये एडीट ऑप्शनद्वारे ही माहिती भरावी लागणार आहे. अर्ज सादर करताना सर्व थकीत खातेदारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक व ग्रामीण बँक अशा सर्व प्रकारच्या वित्तिय संस्थांकडून घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाची माहिती सादर केलेली नसल्यास ती सादर करावी. घेतलेल्या सर्व कर्जाची माहिती सादर केलेली नाही, असे आढळल्यास अशा खातेदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अर्ज सादर करताना सर्व बँकांकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची माहिती सादर करणे अनिवार्य आहे.  शेतकर्‍यांनी सर्व कर्ज खात्यांची माहिती ऑनलाइन अर्जात नमूद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात तसेच जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.