शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आज घटमांडणी, उद्या भविष्यवाणी

By admin | Updated: April 28, 2017 00:16 IST

जळगाव: बहुचर्चित भेंडवळची घटमांडणी उद्या, २८ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी सूर्यास्तासमयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज करणार आहेत.

भेंडवळच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचे लक्ष!जळगाव: बहुचर्चित भेंडवळची घटमांडणी उद्या, २८ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी सूर्यास्तासमयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज करणार आहेत, तर घटामध्ये रात्रभरात झालेल्या बदलाचे अवलोकन करून २९ एप्रिलच्या पहाटे यंदाच्या घटमांडणीची भविष्यवाणी कथन करणार आहेत. या भाकिताकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.३०० वर्षांपूर्वी हवामान खाते, पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना भेंडवळमधील वाघ वंशाचे पूर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरुवात केली आणि ती परंपरा या वाघ कुटुंबीयांनी आजही जपली आहे. या विधीसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करून चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आज संध्याकाळी गावाच्या पूर्वेस असलेल्या शेतात सूर्यास्ताच्यावेळी सारंगधर महाराज व आपल्या सहकार्यासह येवून चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत घटमांडणी करणार आहेत. घटमांडणीनंतर रात्रभर त्या परिसरात कुणीही फिरकत नाही. अशा परिस्थितीत रात्रीच्या पोटात घटामध्ये नैसर्गिकरीत्या जे काही बदल घडून येतात, त्याबाबत दुसऱ्या दिवशी उपस्थित हजारो शेतकऱ्यांच्या समक्ष येणाऱ्या हंगामाचे पीक पावसाचे तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटांबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तविण्यात येते. यावरून यंदा देशाचा राजा बदलणार काय? की तोच कायम राहणार, याचा उलगडा होणार आहे. अशी होणार घटमांडणीअक्षय्य तृतीयेला संध्याकाळी पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत नियोजित शेतात येतात. त्याठिकाणी मातीचा गोल घट करून घटाच्या मधोमध खड्डा करतात. यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतीक म्हणून चार मातीची ढेकळे ठेवतात. त्यावर घागर ठेवण्यात येते. या घागरीवर पापड, पुरी, सांडोळी, करंजी, भजा आणि वडा अशा प्रतीकात्मक खाद्य पदार्थांची मांडणी केली जाते, तर खड्ड्यात घागरीच्या बाजूला राजा व त्याची गादी म्हणजे पान-सुपारी ठेवली जाते, तर मातीच्या घटामध्ये गोलाकार पद्धतीने अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कपाशी, हिवाळी मूग, उडीद, करडी, तांदूळ, जवस, तीळ, मसुर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी १८ प्रकारच्या धान्याची मांडणी करतात.धान्य आणि खाद्यपदार्थांचा वापर करून या घटमांडणीतून झालेल्या बदलाचे दुसऱ्या दिवशी पहाटे अतिशय सूक्ष्म पद्धतीने अवलोकन केले जाते आणि त्यावरून भाकिते वर्तविली जातात. मगच शेतकरी पेरणीची दिशा ठरतो.