खामगाव (बुलडाणा): केवळ खामगाव शहरात सार्जया होणार्या शांती उत्सवाची उद्या, १६ ऑक्टोबर रोजी सांगता होणार असून शहरातून भव्य विसर्जन मिरवणूक निघणार आहे. कोजागिरी पौर्णिमा ७ ऑक्टोबरपासून शांती उत्सवास प्रारंभ झाला होता. शहरात ठिकठिकाणी जगदंबा देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. स्थानिक जगदंबा रोड भागातील मोठी देवी व शहरा तील चौका-चौकात विविध सार्वजनिक मंडळांकडून साजरा होणारा हा उत्सव यामुळे गेल्या १0 दिवसांपासून खामगाव शहराला यात्रेचे स्वरूप आलेले आहे. या उत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उद्या या उत्सवाची सांगता होणार असून, भव्य विसर्जन मिरवणूक दुपारी २ वाजेनंतर निघणार आहे. पोलिसांकडून चोख बंदोबस्तसुद्धा मिरवणुकीवेळी राहणार आहे.
शांती उत्सवाची आज सांगता
By admin | Updated: October 16, 2014 00:24 IST