शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आज रावणदहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:29 IST

बुलडाणा : आश्‍विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा  दसरा म्हणून साजरा केला जातो. देवीच्या घटांची स्थापना  आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचा नवरात्रोत्सव साजरा  केला जातो, तर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात  येतो. या दिवशी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्याची परंपरा  आहे. बुलडाणा अर्बन परिवाराच्यावतीने मागील काही वर्षां पासून रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून,  त्यास शहरवासीयांचा प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देबुलडाणा अर्बन परिवाराचा उपक्रमरा.स्व.संघाचा विजयादशमी उत्सव सोमवारी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आश्‍विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा  दसरा म्हणून साजरा केला जातो. देवीच्या घटांची स्थापना  आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचा नवरात्रोत्सव साजरा  केला जातो, तर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात  येतो. या दिवशी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्याची परंपरा  आहे. बुलडाणा अर्बन परिवाराच्यावतीने मागील काही वर्षां पासून रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून,  त्यास शहरवासीयांचा प्रतिसाद मिळत आहे.दसर्‍याच्या  दिवशी परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची  पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमी पूजन, अपराजिता  पूजन आणि शस्त्र पूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा  ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन  करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्था पना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर.  त्यानंतर योद्धय़ांनी शस्त्र पूजन, व्यापार्‍यांनी व्यापारासाठी प्रयाण  व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे, अशी प्रथा सांगितली जा ते.  या परंपरेला अनुसरून बुलडाणा शहर परिसरात दसरा सण  साजरा केला जातो. बुलडाणा शहराचे कुलदैवत माता जगदंबेला  शमी व आपट्याची पाने अर्पण केल्यानंतर शहरवासी रावण  दहन कार्यक्रमाला हजेरी लावतात.  प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी  रावणाचा वध करून दुष्ट शक्तींवर विजय मिळविला होता. तेव्हा पासून विजयादशमीला प्रतीकात्मक रावणाचे दहन करण्याची  आपल्याकडे परंपरा आहे. त्यानुसार बुलडाणा अर्बन  परिवाराच्यावतीने चिखली मार्गावरील एडेड शाळेच्या प्रांगणावर  विजयादशमीनिमित्त ३0 फूट रावणाचा पुतळा उभारण्यात येणार  असून, सायंकाळी ६.४५ वाजता रावण दहन करण्यात येणार  आहे. यानिमित्त भव्य आतषबाजीदेखील करण्यात येणार आहे.  शहर व परिसरातील तमाम नागरिकांनी रावण दहन कार्यक्रमास  उपस्थिती द्यावी, असे आवाहन बुलडाणा अर्बन परिवाराच्याव तीने करण्यात आले आहे.