शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सरकार बदलणार का?, दुष्काळ सरणार का?; घटमांडणीच्या भाकिताकडे बळीराजाचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 02:02 IST

३०० वर्षांपूर्वी हवामान खाते, पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसतांना भेंडवळमधील वाघ वंशाचे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरुवात केली.

ठळक मुद्देअक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज कथन करणार भविष्यवाणी

जयदेव वानखडे

जळगाव जामोद :  बहुचर्चित भेंडवळची घटमांडणी  १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी सुर्यास्तासमयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज करणार आहेत. तर घटामध्ये राज्यभरात झालेल्या बदलाचे अवलोकन करून १९ एप्रिलच्या पहाटे यंदाच्या घटमांडणीची भविष्यवाणी कथन करणार आहेत. या भाकीताकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

३०० वर्षांपूर्वी हवामान खाते, पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसतांना भेंडवळमधील वाघ वंशाचे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरुवात केली. आणि ती परंपरा या वाघ कुटुंबियांनी आजही जपली आहे. 

या विधीसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करून चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व आपल्या सहकार्यासह येवून चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत घटमांडणी करणार आहेत. घटमांडणीनंतर रात्रभर त्या परिसरात कुणीही फिरकत नाही. अशा परिस्थितीत रात्रीच्या समयी घटामध्ये नैसर्गिकरित्या जो काही बदल घडून येतात त्याबाबत दुसर्‍या दिवशी उपस्थित हजारो शेतकर्‍यांच्या समक्ष येणार्‍या हंगामाचे पिकपाण्याचे तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहुल देणारे भाकीत वर्तविण्यात येते.

यावरून यंदा देशाचा राजा बदलतो काय? की तोच कायम राहणार, पृथ्वीवर काही नैसर्गिक अरीष्ट कोसळेल काय, अवकाळी पावसाची शक्यता, गुराढोरांना चारा अन पिण्यासाठी पाणी असेल काय त्याचबरोबर पिकांचे उत्पन्न आणि धान्याच्या भावामधील तेजीमंदीचा उलगडा होणार आहे. तेव्हा यंदाच्या भाकीताविषयी कमालीची उत्सुकता शेतकर्‍यांमध्ये दिसत आहे. ही मांडणी पाहण्यासाठी व भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरात फार मोठा शेतकरी वर्ग याठिकाणी जमतो. 

अशी होणार घटमांडणी

अक्षयतृतीयेला संध्याकाळी पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत नियोजित शेतात येतात. त्याठिकाणी मातीचे गोल घट करून घटाच्या मधोमध खड्डा करतात यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतिक म्हणून चार मातीची ढेकळे ठेवतात त्यावर घागर ठेवण्यात येते. या घागरीवर पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, करंजी, भजा आणि वडा अशा प्रतीकात्मक खाद्य पदार्थांची मांडणी केली जाते. तर खड्डयात घागरीचे बाजुला राजा व त्याची गादी म्हणजे पान सुपारी ठेवली जाते. तर मातीच्या घटामध्ये गोलाकार पध्दतीने अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कपासी, हिवाळी मुंग, उडीद, करडी, तांदुळ, जवस, तीळ, मसुर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी १८ प्रकारच्या धान्याची मांडणी करतात.धान्य आणि खाद्य पदार्थांचा वापर करून या घटमांडणीतून झालेल्या बदलाचे दुसर्‍या दिवशी पहाटे अतिशय सूक्ष्म पध्दतीने अवलोकन केले जाते आणि त्यावरून भाकीते वर्तविली जातात. मगच शेतकरी पेरणीची दिशा ठरवतो. 

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोद