अमोल ठाकरे / संग्रामपूर(जि. बुलडाणा)ग्रामपंचायतीमधून नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालेल्या संग्रामपूर नगरपंचायतीचा स्थानिक नागरिकांकडे व सहकार क्षेत्रातील संस्थांकडे एकूण ३४ लाख ५0 हजार रुपयांचा कर थकला आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा मार्च महिना उजाडला असताना फक्त २४ टक्केच करवसुली आतापर्यंंंत झाली आहे. शासन निर्णयाप्रमाणे ७0 टक्के कर वसुली करणे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, नगरसेवक यांना बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात येथे आतापर्यंंंत २४.६ टक्केच कर वसुली झाली आहे. सदस्यांना आपले सदस्यत्व कायम ठेवण्याकरिता ७0 टक्के कर वसुली करणे आवश्यक आहे. तसेच करवसुली नसल्याने याचा परिणाम विकास कामांवर होत असून, अनेक समस्या निर्माण होत आहेत. तसेच विकास कामेसुद्धा रखडली आहेत. थकीत करवसुलीसाठी नगर पंचायतीच्या वतीने बिल फॉर्म व मागणीच्या नोटीसेस कर थकबाकीदारांना बर्याचवेळा बजावण्यात आल्या आहेत. मात्र थकबाकीदारांकडून त्यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे करवसुलीचा शेवटचा महिना उजाडला तरी अद्याप २४ टक्केच करवसुली करण्यात आली आहे. त्यामुळे शेवटच्या महिन्यात तरी करवसुलीचे उद्दिष्ट गाठता यावे, यासाठी करवसुली पथक नगरपंचायतीने नियुक्त केले आहे. या पथकातील कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना विनंत्या करून कर वसुलीचा प्रयत्न करीत आहेत.एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कर थकीत असल्यामुळे नगरपंचायतीची विकासकामे रखडली असून, कर भरणार्या नागरिकांना मात्र नाहक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या कर वसुलीसंदर्भात आता वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
३४ लाखांचा कर थकीत!
By admin | Updated: March 5, 2016 02:32 IST