शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

रेती घेऊन जाणार्‍या टिप्परची टिप्परला धडक; आठ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 2:18 AM

डोणगाव: रेती घेऊन जाणार्‍या टिप्परने धडक दिल्यामुळे काळी-पिवळीतील आठ जण जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान डोणगाव- मेहकर मार्गावरील खान यांच्या शेताजवळ घडली. जखमींवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, त्यापैकी तिघांना मेहकरला हलविण्यात आले.

ठळक मुद्देडोणगाव-मेहकर मार्गावरील खान यांच्या शेताजवळ घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: रेती घेऊन जाणार्‍या टिप्परने धडक दिल्यामुळे काळी-पिवळीतील आठ जण जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान डोणगाव- मेहकर मार्गावरील खान यांच्या शेताजवळ घडली. जखमींवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, त्यापैकी तिघांना मेहकरला हलविण्यात आले.मालेगावकडे रेती घेऊन जाणार्‍या टिप्पर क्रमांक एम. एच. ३७ जे ७७२२ ने समोरून येणार्‍या एम. एच. २८ एच. १७४४ क्रमांकाच्या काळी-पिवळीला धडक दिली. यामध्ये प्रवासी जीपमधील मुस्तफा खान साहेब खान, मोहन जुनघरे, युसूफ खान दिलदार खान (सर्व रा.  डोणगाव), गोपाल खंडारे (रा. नेतन्सा), वसंता दुराजी जाधव (लोणी गवळी), अलीम खान सलीम खान, केतन  ठाकरे, भगीरथी शिंदे (रा. द्रुक बोरी) यांचा जखमीत समावेश आहे. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

अज्ञात वाहनाची धडक; विद्यार्थी जखमीबुलडाणा: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेदरम्यान तालुक्यातील ढालसावंगी येथे घडली. दरम्यान, जखमीवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ढालसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत इयत्ता चवथीत शिकणारा शेख सुबान शेख इब्राहीम हा विद्यार्थी दुपारच्या सुटीत घराकडे जात होता. भरधाव वेगात जाणार्‍या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेची माहिती मिळताच शाळेचे शिक्षक व नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा