शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'टायगर कॉरिडॉर'ला चालना; वन ग्राम पुनर्वसनाची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 11:04 IST

ज्ञानगंगा अभयारण्यातील वन ग्राम असलेल्या देव्हारी गावाचे पूनर्वसन हे त्वरित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ज्ञानगंगामध्ये आलेल्या टी-१ सी-१ मुळे बुलडाणा, अकोला आणि मुक्ताईनगर भवानी अभयारण्यादरम्यानच्या टायगर कॉरिडॉरला चालना मिळणार असली तरी ज्ञानगंगा अभयारण्यातील वन ग्राम असलेल्या देव्हारी गावाचे पूनर्वसन हे त्वरित करण्याची गरज निर्माण झाली आहे.यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सोबतच ग्रामसभा घेवून पुनर्वसना संदर्भातील पर्यायही ग्रामस्थांनी निवडला आहे. मात्र सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात या गावाच्या पूनर्वसनासाठी निधी त्वरित प्राप्त होणे हे कसब प्रशासकीय पातळीवर तथा राजकीय इच्छा शक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे याला प्राधान्य देण्याची अवश्यकता आहे. सोबतच भविष्यात येथे वाघांची संख्या वाढल्यानंतर मानव-वन्यजीव संघर्ष होणार नाही, यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्याची गरज असून, प्रत्यक्ष अंबाबरवा, काटेपूर्णा आणि जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर भवानी अभयारण्यादरम्यानचा कॉरिडॉर वृद्धींगत करण्याची योजनाही आखावी लागणार आहे. नाही म्हणायला अंबाबरवा अर्थात मेळघाटमधील वाघ हा मुक्ताईनगर भवानी अभयारण्यापर्यंत गेल्याचाही इतिहास आहे. तसेच मेळघाटातील एक बिबट अगदी मुंबई जवळील अभयराण्यापर्यंत जावून आल्याचे काही वन अधिकारी सांगतात. त्यामुळे प्रत्यक्षात कॉरिडॉर अस्तित्वात येण्याच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. यापूर्वीही मेळघाटातील वाघ अनेर डॅम पर्यंत नेण्याबाबत विचारमंथन झालेले आहे. आता टी-१ सी-१ वाघामुळे त्यास आणखी चालना मिळू शकते. मुक्ताईनगर भवानी अभयारण्यातील वाघही मलकापूर तालुक्यातील सीमावर्ती भागात जानेवारी २०१९ दरम्यान येवून गेल्याचे सांगण्यात येते. त्या भागातील ग्रामस्थांनीही यापूर्वी तसा दावा सुद्धा केला होता. मात्र हे करत असताना वाघांना लागणारे वनक्षेत्र वाढविण्याची गरज असून प्रसंगी प्रादेशिक वन विभागाच्या जंगलाचाही अभयारण्याच्या विस्ताराच्या दृष्टीने ज्ञानंगगात समावेश होवू शकतो.

२९८ कुटुंबाचे करावे लागणार पूनर्वसनज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या देव्हारी गावाचे पूनर्वसन करावे लागणार आहे. येथे जवळपास २९८ कुटुंबे असून त्यांच्या पुनर्वसनासाठी ५७ कोटी रुपयांची अवश्यकता आहे. तसा प्रस्तावही पाठविण्यात आलेला आहे. कोरोना संकट पाहता हा निधी त्वरित उपल्बध करण्यासाठी रेटा द्यावा लागेल.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यTigerवाघ