शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसमध्ये पुन्हा तिकिटांची टकटक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 12:57 IST

ST Bus News ९० टक्के ईटीआयएम  (इलेक्ट्रॉनिक तिकीट व्हेंडिंग मशीन) नादुरुस्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देसर्वच बसेसमध्ये तिकिटासाठीची टकटक सुरू झाली आहे.या मशीनमध्ये दोष निर्माण होत आहेत. 

-  सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : एसटी महामंडळाच्या वाहकांना बसेसमध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी उपलब्ध केलेल्या ९० टक्के ईटीआयएम  (इलेक्ट्रॉनिक तिकीट व्हेंडिंग मशीन) नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या सर्वच बसेसमध्ये तिकिटासाठीची टकटक सुरू झाली आहे. त्यातच मशीनची सवय  झालेल्या वाहकांनाही त्याचा त्रास होत आहे. तर स्मार्ट कार्ड सवलतीतही अडचणी निर्माण झाल्या आहेत. महामंडळाने ट्रायमॅक्स कंपनीसोबत करार करून वाहकांना ‘’ईटीआयएम’’ (इलेक्ट्रॉनिक तिकीट व्हेंडिंग मशीन) उपलब्ध करून दिल्या; परंतु कालांतराने या मशीनचे आयुष्यमान झाल्यामुळे या मशीन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले. त्यातच मार्चअखेर लागलेल्या लाॅकडाऊनमध्ये मशीनचा वापर थांबला. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती झाली नाही. परिणामी, महामंडळाच्या सर्वच आगारात असलेल्या एकूण मशीनपैकी ९० टक्के बंद पडल्या आहेत. मशीन नादुरुस्त झाल्यास आगारात त्या दुरुस्त करण्यासाठी ट्रायमॅक्स कंपनीने कुठलीही व्यवस्था केलेली नाही.   दुरुस्तीसाठी जिल्हास्तरावर द्याव्या लागतात; मात्र तेथेही दुरुस्ती होत नसल्याची माहिती आहे. 

मशीनचे आयुर्मान संपुष्टात ‘’ईटीआयएम’’ मशीन उपलब्ध करून दिल्या; परंतु कालांतराने या मशीनचे आयुष्यमान झाल्यामुळे या मशीनमध्ये दोष निर्माण होत आहेत. एसटी महामंडळाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या मध्यवर्ती संयुक्त विचारविनिमय बैठकीत उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी ईटीआयएम मशीन विषयावर या मशीनचे आयुष्यमान जास्त झाल्याचे मान्य केले. 

दोष वाहकांच्या माथी मशीन नादुरुस्त होण्यास वाहक जबाबदार नाही; परंतु या मशीनचे स्पेअर पार्ट, बॅटरी गहाळ झाल्यास त्यास वाहक दोषी राहणार असल्याचे सांगण्यात आले. तरीसुद्धा एसटी महामंडळात ईटीआयएम मशीन नादुरुस्त झाल्यास त्याचे खापर वाहकांच्या माथी फोडून त्यांच्याकडून त्याबाबत वसुली करण्याचा प्रकार काही ठिकाणी सुरू झाला आहे. 

तिकीट मशीन दुरुस्तीसाठी बुलडाणा येथे पाठविल्या जातात. त्यांच्याकडून दुरुस्ती झाल्यानंतर त्या वापरात येतील. - आर.यू. पवार,स्थानक प्रमुख, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावstate transportएसटी