खामगाव: स्थानिक टिचर्स कॉलनीत एका बंद घरातून ३७ हजार रुपये चोरी गेल्याची घटना शुक्रवादी उजेडात आली. टिचर्स कॉलनीतील एहसानउल्ला खान नुरूल्ला खान (३७) हे आपल्या परिवारासह पिंपळगाव राजा येथे गेले होते. दरम्यान, त्यांच्या बंद घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सुमारे ३७ हजार रुपयांचा मुद्दे माल चोरून नेला. या प्रकरणी खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला. टिचर्स कॉलनीत २९ मे नंतर घडलेली लागोपाठ ही दुसरी घटना असून वाढत्या चोरींवर अंकुश मिळविण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
टिचर्स कॉलनीत घरफोडी
By admin | Updated: June 6, 2015 00:40 IST