शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अनुदान हडपणाऱ्या अधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:40 IST

बनावट दस्तऐवज तयार करून ४ लाख ११ हजार ८९४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी १२ जून रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्युज नेटवर्कबुलडाणा: शासकीय अनुदान हडपणाºया येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांसह तीन जण एलसीबीच्या जाळ्यात अकडले आहेत. बनावट दस्तऐवज तयार करून ४ लाख ११ हजार ८९४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी १२ जून रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश पांडुरंग चिमणकर, शिवाजीराजे भोसले, ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्था बुलडाणाचे अध्यक्ष किरण भगवान धंदर, सचिव शरद प्रकाश बावस्कर व ओम साई कार केअर गॅरेजसह जागेचे मालक नीलेश अरविंद शिंदे यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश पांडुरंग चिमणकर यांनी चिखली रोडवर ओम साई कार केअर गॅरेजच्या नावावर शासकीय अनुदानाची प्रक्रिया पूर्ण केली होती. जिल्हा कौशल्य विकास रोजगार केंद्रला लागणाºया सर्व कागदपत्रांची पुर्तताही केली. त्यासाठी इन्स्ट्युट चालक व इतर दोघांना हाती धरून शासकीय प्रक्रिया पूर्ण केली. परंतू प्रत्यक्षात चिखली रोडवर साई कार केअर नावाचे इन्स्ट्युटचे कार्यरत नव्हते. शासकीय अनुदानासाठी सर्व बनावट कागदपत्र तयार करून प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये ४ लाख ११ हजार रुपयांचे अनुदान जमा झाले. परंतू यासंदर्भात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे काही महिन्यापूर्वीच तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार तपास चके्र फिरविली असता, हा सर्व प्रकार बनावट असल्याचे दिसून आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशी अंती इन्स्ट्युट नसतानाही शासकीय अनुदानाचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान, यापक्ररणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिमचे पोलीस उपअधीक्षक शंकर व्ही. शेळके यांनी १२ जून रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून शासनाची ४ लाख ११ हजार ८९४ रुपयांची फसवणूक चौघांविरोधात बुलडाणा शहर पोलिसांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाfraudधोकेबाजी