शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

तीन शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने जिल्ह्याच्या क्रीडाक्षेत्राला झळाळी !

By निलेश जोशी | Updated: July 15, 2023 20:19 IST

५३ वर्षांत १२ जणांना मिळाला पुरस्कार : जागतिक तिरंदाजीत बुलढाण्याचे वर्चस्व

बुलढाणा : अमॅच्युअर हरवलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला दोन खेळाडू व एका प्रशिक्षकाला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्यामुळे एक नवी झळाळी मिळाली आहे. १० वर्षांनंतर बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडू व प्रशिक्षकाला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे १९९० पूर्वीप्रमाणे पुन्हा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस येऊ शकतात.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या या क्रीडा पुरस्कारामध्ये भारतीय तिरंदाजी संघाचे २०१९ पासून प्रशिक्षक असलेले चंद्रकांत इलग यांना २०२१-२२ चा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, तर तिरंदाजीचीच खेळाडू मोनाली जाधवला आणि दिव्यांग खेळाडू अनुराधा सोळंकी हिला व्हीलचेअर तलवारबाजीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या क्रीडाजगताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी ही नोंद व्हावी. शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या आजपर्यंतच्या ५३ वर्षांच्या इतिहासात बुलढाणा जिल्ह्यातील १२ जणांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार खेळाडू तसेच संघटक म्हणून मिळालेला आहे. त्यावरून बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राची व्याप्ती स्पष्ट होते.

-चंद्रकांत इलग-चंद्रकांत इलग हे सध्या भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक आहेत. सैन्यातून २०१२ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्याच वर्षी त्यांनी धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षण बुलढाण्यात नि:शुल्क सुरू केले. त्यानंतर ते पोलिस दलात सहभागी झाले. त्यांच्या मेहनतीमुळे देशात आज महाराष्ट्र पोलिस दलाचे धनुर्विद्येत नाव झाले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात प्रथमेश जावकार जागतिक क्रमवारीत अव्वल आहे. मोनाली जाधवने चीनमधील आंतरराष्ट्रीय पोलिस गेममध्ये भारताचा डंका वाजवला होता. मिहीर अपारनेही यूथ वर्ल्ड कप गाजवला; तर आता मानव जाधवनेही आयर्लंडमध्ये जिल्ह्याच्या लौकिकात नुकतीच भर टाकली.

-मोनाली जाधव-मोनाली जाधव ही सध्या पोलिस दलात आहे. २०१९ मध्ये तिने चीनमधील चेंगडू येथे भारतासाठी दोन सुवर्ण व एक कांस्यपदक पटकावले आहे. एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून तिने लौकिक मिळविला आहे. सामान्य घरातून आलेल्या मोनालीने आपल्या कष्टाच्या जोरावर ही किमया साधली आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांच्यासोबतच तिला हा पुरस्कार खेळाडू म्हणून जाहीर झाला आहे.

अनुराधा सोळंकीअनुराधा सोळंकींना दिव्यांग खेळाडू म्हणून व्हीलचेअर तलवारबाजीमध्ये शिवछत्रपती क्रीडापुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक पातळीवर सध्या ३८व्या स्थानावर अनुराधा सोळंकी आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी आतापर्यंत सात पदके मिळविली. जिल्हाधिकारी कार्यालयात त्या कार्यरत आहेत.

१९८२-८३ मध्ये मिळाला होता पहिला पुरस्कारबुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात संघटक म्हणून पहिला शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार मलकापूरचे स्व. संभाजीराव जगदाळे यांना १९८२-८३ मध्ये मिळाला होता. त्यानंतर मलकापूरचे छत्रपती दंड (१९९५-९६), टी. ए. सोर (१९९६-९७), विपप्रताप नवनीत थानवी (१९९८-९९) यांना क्रीडा संघटक म्हणून पुरस्कार मिळाला होता. दरम्यान नांदुरा येथील राम कोलते ( २०००-०१), अमडापूर येथील सुषमा कांबळे, अरुणा देशमुख (२००४-०५) यांना शुटींग बॉल खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर खामगाव येथील सीताराम तायडे (२००८-०९) आणि शेषनारायण लोढे (२०१३-१४) मध्ये क्रीडा संघटक म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

इलग जर्मनीसाठी रवानाभारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक असलेले चंद्रकांत इलग हे १५ जुलै रोजी जर्मनीतील बर्लिन येथे होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. २७ जुलै पासून तेथे ही स्पर्धा सुरू होत आहे.