शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपूर येथील’ डॉक्टरच्या कुटुंबातील तिघे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:28 IST

३८ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुषांसह २ वर्षीय मुलीचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर:  जळगाव जामोद येथील बाधित एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संग्रामपूर येथील डॉक्टर कुटुंबियातील बारापैकी तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. येथील डॉक्टर कुटुंबियांतील अकरा व एक घरात काम करणारा असे बारा लोकांना तपासणीसाठी कोविड रुग्णालय शेगाव येथे पाठवण्यात आले होते. रविवार २१ जून रोजी सकाळी यापैकी नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर तीन जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात एक ३८ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुषांसह २ वर्षीय मुलीचा समावेश आहे. काही दिवसापूर्वी शेगाव येथे लग्न समारंभ पार पडला. त्या लग्नसमारंभात संग्रामपूर येथील डॉक्टर कुटुंबीयांच्या संपर्कात जळगाव जामोद येथील एक डॉक्टर कोरोना बाधित आल्याने या डॉक्टर कुटुंबियांना हायरिक्समध्ये क्वारंटीन करण्यात आले. त्यांचे रिपोर्ट दि. २१ रोजी प्राप्त झाले. यात तीन जण पॉझिटिव्ह आल्याने संग्रामपुरात खळबळ उडाली.  आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णांच्या घराजवळील परीसर सील करून कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. डॉक्टर कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या हायरीक्स मधील व्यक्तींचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मयूर वाडे यांनी दिली आहे.

पातूर्ड्यात एक महीला पॉझिटिव्ह

संग्रामपूर तालुक्यातील पातूर्डा येथील नऊ जणांना कोविड रुग्णालय शेगाव येथे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट रविवारी रोजी प्राप्त झाले आहे. नऊपैकी आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ३७ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. पातुर्डा येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १६ वरून वाढून १७ झाली आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या