शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

मामासह दोन भाच्यांचा धरणात बुडून करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 10:29 IST

Buldhana News : मामा व दोन भाच्यांचा धरणात डूबुन करूण अंत झाल्याची घटना मंगळवार १८ मे रोजी सकाळी उघडकीस आली.

लोकमत न्युज नेटवर्कजळगांव जामोद: तालुक्यातील धानोरा महासिध्द येथील लघु प्रकल्पात (हत्ती पाऊल धरणात) मामा व दोन भाच्यांचा धरणात डूबुन करूण अंत झाल्याची घटना मंगळवार १८ मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थक्षेत्र धानोरा महासिध्द गावांवर शोककळा पसरली आहे. पुणे येथे नोकरीवर असलेला विनायक गाडगे (२७), त्याच्या काका चा मुलगा तेजस गाडगे (१८) व त्यांचे दाताळा येथील मामा नामदेव वानखडे (४३) तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले. सध्या उन्हाळा असल्याने ते पाण्यात पोहण्यासाठी गेले.परंतु रात्री उशिरापर्यंत तिघे जण घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधा शोध सुरू केला. घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला दिली. धरण परिसरात शोध सुरू असताना त्यांचे कपडे व मोबाईल फोन पाण्याचे काठावर आढळून आले. तो पर्यंत रात्र झाल्यानें अंधारात शोध मोहिम थांबविण्यात आली. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये मुतदेह तरंगताना दिसले. पट्टीच्या पोहणार्यांच्या मदतीने तिन्ही मृतदेह बाहेर काढले.
टॅग्स :Damधरण