शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

मंत्रिपदापासून वंचित तीन मतदारसंघ

By admin | Updated: October 29, 2014 00:24 IST

बुलडाणा जिल्ह्यातील भाजपचे तिनही आमदार मंत्रीपदाचे दावेदार.

बुलडाणा : बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव, जळगाव जामोद व मलकापूर या तीन मतदारसंघामध्ये कधीही मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले नाही. काँग्रेसची सत्ता असतानाही या मतदारसंघांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही व युती सरकारच्या काळातही हेच चित्र कायम राहिले. यावेळी मात्र राज्यात भाजपाची सत्ता आली असून, या तीनही मतदारसंघात भाजपाचे आमदार विजयी झाले आहे. हे तीनही आमदार पक्षामध्ये मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार असल्यामुळे आता मुख्यमंत्री ठरला, मंत्रिपद कुणाला, याची चर्चा जिल्हाभरात जोर धरू लागली आहे. या तीनही दावेदारांमध्ये विधान परिषदेचे आमदार भाऊसाहेब फुंडकर हे सर्वात प्रबळ दावेदार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले आमदार फुंडकर हे भाजपाचा बहुजन चेहरा म्हणून ओळखले जातात. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद, पणन महासंघाचे संचालक, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, लोकसभा व विधानसभेचे सदस्य व आता विधान परिषदेचे सदस्य असा दीर्घ अनुभव असलेले आ. फुंडकर हे पश्‍चिम वर्‍हाडात आपली ताकद ठेवून आहे. यावेळी खामगाव मतदारसंघातून काँग्रेसची सत्ता हद्दपार करीत त्यांनी अँड. आकाश फुंडकर यांना विजय मिळवून दिला व भाजपाचा एक आमदार वाढला त्यामुळे येणार्‍या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी निश्‍चित मानली जात आहे. कदाचित मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यास ते वरिष्ठ सभागृहाचे सभापती होऊ शकतात, असाही मतप्रवाह भाजपामध्ये आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून जनसंघाचा गड व भाजपाचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मलकापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या आमदार चैनसुख संचेती यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, ही मागणी पक्षश्रेष्ठीकडे भाजपा कार्यकर्ते करीत आहेत. आमदार चैनसुख संचेती यांनी नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत स्तरावर पक्षाची मजबूत बांधणी केली व वाढवला त्याचबरोबर मतदारसंघात दहा हजार कोटी रुपयांच्या सिंचन योजना खेचून आणल्या आहेत. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाला आजतागायत मंत्रिपदाचा मान मिळाला नाही. कधी विरोधी पक्षाचा आमदार असल्याने संधी हुकली, तर कधी सत्ताधारी गटाच्या आमदाराचा मंत्रिपदासाठी विचारच झाला नाही. यावेळी मात्र डॉ. संजय कुटे यांच्या रूपाने सत्ताधारी भाजपा गटाचे हॅट्ट्रिक करणारे आमदार या मतदारसंघात असल्याने मंत्रिपदाचा लाल दिवा या मतदारसंघात येईल, अशी अपेक्षा या मतदारसंघातील जनता ठेवून आहे.