शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

तीन टक्के मुद्रांक शुल्क माफीमुळे व्यवहारांना चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:38 IST

Buldhana, Real Estate मुद्रांक शुल्क माफीमुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होत आहे

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मध्यंतरी देण्यात आलेल्या तीन टक्के मुद्रांक शुल्क माफीमुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होत असून जवळपास २० टक्क्यांनी व्यवहार वाढल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, अमरावती, नागपूर, मुंबई, पुण्यासह राज्यातील अन्य भागात कौटुंबिकस्तरावर प्रलंबीत असलेले व्यवहारही वाढण्यास मदत झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात व्यापक प्रमाणावर नाही पण अर्थव्यवस्था सुरळीततेच्या मार्गावर येण्यास मदत होत आहे.परिणामस्वरुप मधल्या काळात स्थिरावलेल्या किंवा मंदीत गेलेली अर्थव्यवस्था बऱ्यापैकी मार्गी लागण्यास मदत होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात त्याचा वरकरणी अपेक्षीत परिणाम जाणवत नसला तरी व्यवहार वाढल्याचे एकंदरीत चित्र आहे. विशेष म्हणजे कौटुंबिकस्तरावर प्रारंभीच्या मुद्रांक शुल्काची स्थिती पाहता रखडलेले व्यवहार पुर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे एकंदरीत व्यवहारावरून दिसून येते. त्यामुळे व्यापक प्रमाणावर नाही परंतू बºयापैकी ती रुळावर येण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे. वास्तविक तीन टक्के मुद्रांक शुल्क माफी दिलेली असतानाच सप्टेंबर महिन्याच्य पहिल्या आठवड्यात रेडीरेकनरच्या दरात जिल्ह्यात १.४५ टक्क्यांनी सरासरी वाढ करण्यात आली होती. त्यामुले एकंदरीत स्थिती ही व्यवहाराच्या पातळीवर सारखीच राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र तीन टक्के मुद्रांक शुल्क माफीचे काही छुपे पैलुही यामुळे समोर आले असून त्याचा फायदा हा जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहाराला झाला. प्रामुख्याने कौटुंबिकस्तरावरील व्यवहार जादा मुद्रांक शुल्कांमुळे वर्षानुवर्षे रखडलेले होते. ते आता वेगाने ही मुद्रांक शुल्क माफी झाल्यामुळे होत आहे. प्रामुख्याने हे व्यवहार वाढले आहेत. यासोबतच कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ठप्प झाले होते. ते आता पुर्वपदावर येत आहे. सोबतच गृहनिर्माण क्षेत्रातही यामुळे आता तेजी येण्यास प्रारंभ झाला. जिल्ह्यातही यावर्षी २७६ कोटींचा गृहनिर्माण क्षेत्रात पतपुरवठा करण्याचे उदिष्ठ आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाReal Estateबांधकाम उद्योग