शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांना मदत मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- ठाकरे

By admin | Updated: December 25, 2016 02:32 IST

विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडून मलकापूर येथील दंगलग्रस्त भागाची पाहणी.

मलकापूर(जि. बुलडाणा), दि. २४- उद्भवलेल्या दंगलीदरम्यान शहरातील वाहने व दुकानांसह इतर नुकसानाची भरपाई त्या-त्या नुकसानग्रस्तांना देण्यात यावी, अशी मागणी करीत या मागणीचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करू, नुकसानभरपाई मिळेस्तोवर स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी करताना नुकसानग्रस्तांना दिली.शहरातील जुन्या गावात मागील आठवड्यात उसळलेल्या दंगलीत अनेक वाहने, दुकानांची तोडफोड व जाळपोळ झाली. तसेच वस्त्यांवर दगडफेकही झाली. ही घटना दुर्दैवी असून, घटनेदरम्यान नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ व शहराध्यक्ष राजू पाटील अशा काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी जखमी होऊनही जातीय तणाव शमविण्याचा प्रयत्न केला, ही बाब प्रशंसनीय असून, काँग्रेस कुठेही अन्याय होऊ देणार नाही, अन् जिथे कुठे अन्याय होत असेल, तिथे काँग्रेसच अन्यायग्रस्तांच्या पाठीशी ठाम उभी राहते. घडलेल्या प्रकाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची मागणीसुद्धा केली आहे, अशी माहिती माणिकराव ठाकरे यांनी जुन्या गावातील नागरिकांना भेटीदरम्यान दिली.या पाहणी व भेटीदरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे, आ. हर्षवर्धन सपकाळ, जि.प. अध्यक्ष अलका खंडारे, बलदेवराव चोपडे, डॉ.अरविंद कोलते, अँड. हरीश रावळ, दिलीप देशमुख, नारायणदास निहलाणी, अँड. साहेबराव मोरे, राजू पाटील, हाजी रशिदखॉ जमादार, अँड.मजीद कुरेशी, अँड.जावेद कुरेशी, कपील राठी, राजेंद्र वाडेकर, श्याम राठी, नीलेश पाऊलझगडे, लक्ष्मणराव घुमरे, युसुफखाँ, अनिल गांधी, गोपाल राठी, अनिल जैस्वाल यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.