शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
2
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
3
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
4
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
5
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
8
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
9
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
10
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
11
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
12
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

शाळांजवळ जैविक कचरा फेकल्याने धोका!

By admin | Updated: April 13, 2017 00:59 IST

डोणगाव: दवाखान्यात निर्माण होणारा जैविक कचरा हा घातक असल्याने याबाबत शासनाच्यावतीने कडक नियम बजावले आहेत. मात्र, डोणगावात या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे.

नियमांची पायमल्ली : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष डोणगाव: दवाखान्यात निर्माण होणारा जैविक कचरा हा घातक असल्याने याबाबत शासनाच्यावतीने कडक नियम बजावले आहेत. मात्र, डोणगावात या नियमांची सर्रास पायमल्ली होत असून, चक्क दोन शाळांजवळच हा कचरा फेकण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. डोणगावातील डॉक्टरांबरोबर शासनाच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने डोणगावात चक्क दोन शाळांच्यामध्ये राज्य महामार्गालगतच जैविक कचरा फेकून विल्हेवाट लावली जात आहे. जैविक कचऱ्यामुळे कावीळ, क्षयरोगसारखे गंभीर आजार होऊ शकतात. मात्र, ग्रामीण भागात यासंदर्भात आवश्यक त्या प्रमाणात जनजागरण केले जात नाही. परिणामी गावातील नागरिकांना याचे कोणतेही गांभीर्य नाही. डोणगाव परिसरात लहान-मोठे रुग्णालये आहेत. या दवाखान्यात निर्माण होणारा जैविक कचरा सर्रास उघड्यावर टाकला जातो. गावातील व राज्य महामार्गाजवळ असलेल्या मदन वामन पातूरकर शाळेजवळ असलेल्या पुलाजवळ तर या कचऱ्याचा ढीगच पहावयास मिळतो, तर राज्य महामार्गाच्या आजूबाजूलाही हा जैविक कचरा टाकलेला दिसून येतो. यामध्ये रक्ताळलेले कपडे, सलाईन, सिरींज, नळ्या, इंजेक्शन आदी कचरा मोठ्या प्रमाणात दिसतो. या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा शासनाचा आदेश असताना मात्र डोणगावात हा कचरा उघड्यावर फेकून दिला जातो. या राज्य महामार्गावरून जाणारे विद्यार्थी कुतूहलाने या कचऱ्यातून इंजेक्शन, सलाईन नळ्या उचलतात. त्यामुळे डोणगाव येथे सदर जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन डॉक्टरांकडून केले जात नसल्याने व वैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष असल्याने सर्रास राज्य महामार्गालगतच फेकून दिले जाते. नुकतेच तालुका वैद्यकीय अधिकारी सरतापे व त्यांच्या पथकाने डोणगावात दवाखान्याची चौकशी केली तेव्हा त्यांना हा राज्य महामार्गालगतचा जैविक कचरा का दिसला नाही. याबाबतही जागरुक नागरिकांमध्ये चर्चा आहे.असा आहे नियमडॉक्टरांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ बायोमेडिकल वेस्ट आधारे रजिस्ट्रेशन व बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्टनुसार याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांचा परवाना घेणे आवश्यक आहे. यानंतर जैविक वैद्यकीय कचरा उचलण्यासाठी विशेष वाहन ठरलेल्या तारखेत त्या गावात पाठविले जाते. हा कचरा त्याच वाहनात टाकणे आवश्यक आहे. हा कचरा रस्त्यावर किंवा भंगारात विकणे गैरकायद्याचे समजले जाते.