शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

स्मारकांचे नैसर्गिक सौंदर्य धोक्यात

By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST

लोणार : पुरातन विभागाचे दुर्लक्ष.

मयुर गोलेच्छा / लोणार पुरातन सर्वेक्षण विभागाचे राष्ट्रीय संरक्षीत स्मारके असलेल्या लोणार शहरातील पुरातन विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील पुरातन स्मारके घाणीच्या विळख्यात आहेत. त्यामुळे स्मारकांचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात आले आहे.येथे पुरातन विभागाचे ३६ लहानमोठे राष्ट्रीय संरक्षीत स्मारके असल्यामुळे याठिकाणी पुरातन विभागाच्या उपविभागीय कार्यालयाची स्थापना झालेली आहे. शहरातील पुरातन स्मारकांना प्राचीन वैभव असून, ही संरक्षीत स्मारक सुंदर, नक्षीकाम झालेली असून, सर्व मंदिरेही अजिंठा, वेरुळप्रमाणे हेमाडपंथी आहेत. ये थील हेमाडपंथी मंदिराचे जतन व संवर्धव व्हावे या उद्देशाने केंद्रशासनाने भारतीय पुरातन सर्वेक्षण विभागाला कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला असून सुद्धा मंदिराची दुरावस्थाच आहे. मंदिराच्या अवशेषाचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. लोणार सरोवर व शहरातील पर्यटन स्थळांना विकसीत करण्यासाठी शहरात कॅनडा येथील तज्ञ अभियंते दाखल झाले असून, त्यांनी या मंदिराच्या दुरावस् थेविषयी खंत व्यक्त केली. शहरातील अद्भुत कलाकृतीचा नमुना असलेल्या दै त्यसुदन मंदिर, अहिल्याबाई होळकर अन्नछत्र, प्राचीन लिंबी बारव, धारातिर्थ, पाप हरेश्‍वर मंदिर याठिकाणी सुद्धा घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी चौकदार नसल्यामुळे त्याठिकाणी गुटखा पुड्या, प्लास्टीकच्या पिशव्या याचाही स्तर साचत आहे. धारातिर्थ परिसरात आंघोळ करतांना साबन, शॉम्पु आदी वस्तु वापरण्यास तसेच कपडे धुण्यास प्रतिबंध असल्याचे फलक लावण्यात आले असून सुद्धा नियमांचे उल्लंघन केल्या जात आहे. धारातिर्थ परिसरात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात यावे, अशी अनेकवेळा मागणी करण्यात आली आहे. परंतु याकडे दुर्लक्षच होत आहे. जागतीक किर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या पुरातन वास्तुकडे विभागाचे कर्मचारी व अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे येथील वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास पुरातन वास्तुचे नैसर्गिक सौंदर्य लुप्त होवून पर्यटन नगरीचे वैभव लोप पावल्याशिवाय राहणार नाही.