शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

हजारो हेक्टरवरील पिके सुकली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:20 IST

मेहकर: यावर्षी सुरुवातीला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणी केली; मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली आहेत. जिल्हय़ात सात लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे; मात्र यापैकी लाखो हेक्टवरील पिके पावसाअभावी सुकत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देआर्थिक संकटामुळे शेतकरी हवालदिलसात लाख हेक्टरवर झाली आहे जिल्हय़ात पेरणी

उध्दव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: यावर्षी सुरुवातीला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणी केली; मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली आहेत. जिल्हय़ात सात लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे; मात्र यापैकी लाखो हेक्टवरील पिके पावसाअभावी सुकत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.    जिल्हय़ात मागील ५ ते ६ वर्षांंपासून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटत आहे. यावर्षी सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला होता. शेतकर्‍यांनी कर्ज काढून तर काहींनी उधारीवर खते, बी-बियाणे खरेदी करून खरिपाची पेरणी केली; मात्र ८ ते १0 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्हय़ातील चिखली, मोताळा, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यासह मेहकर तालुक्यातील जानेफळसह वरवंड, पाथर्डी, पारखेड, उटी, घुटी, मोहना मांडवा, घाटनांद्रा, बोथा, द्र्रुगबोरी, इसवी, पार्डी, गोमेधर, लोणीकाळे, बार्डा, वडाळी, देळप आदी परिसरातील पिके सध्या पाण्याअभावी सुकू लागली आहेत. या भागातील नागरिकांचे जीवन हे शेतीवरच अवलंबून आहे. या भागात बागायती व ओलिताखाली जमीन नसून कोरडवाहू शेती आहे. गोरगरीब शेतकर्‍यांनी बँकांकडून, सावकारांकडून कर्ज घेऊन पिकांची पेरणी केलेली आहे. येणार्‍या पिकांच्या भरवशावर या शेतकर्‍यांनी आर्थिक नियोजन लावून ठेवलेले आहे; परंतु सध्या पिकांची स्थिती पाहता शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. शेतकर्‍यांनी सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांची पेरणी केली आहे; मात्र शेतातील पिके पाहता शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हजारो हेक्टरवरील पिके सुकू लागली आहेत.         शेतकरी चिंताग्रस्त  झाले आहेत. तरी जिल्हय़ात शेतांमध्ये नुकसान होत असलेल्या पिकांचे सर्वेक्षण करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपा किसान आघाडीचे अध्यक्ष शेषराव धोटे, घायवट, शेख इस्माईल शे. रशीद आदींनी केली.

सर्वेक्षण करण्याची मागणीपावसाने दडी मारल्याने जानेफळ भागातील पिके सुकू लागली आहेत. शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने नुकसान होत असलेल्या परिसरातील पिकांचा सर्वेक्षण करून शेतकर्‍यांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.

शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकटपावसाअभावी मेहकर तालुक्यातील शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळत आहे. सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकांचे नुकसान होत आहे. पाऊस नसल्याने पिके सुकत आहेत. शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. सुकत असलेल्या पिकांचा सर्व्हे व्हावा, शेतकर्‍यांना दिलासा मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना नुकसानीचा सर्व्हे करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे. 

उंटअळीचा प्रादुर्भाव कनका: कनका परिसरात सोयाबीन, मूग, उडीद, कपासी व अन्य पिके पावसाअभावी शेवटची घटका मोजत आहेत. तर त्यातच उंटअळीचा प्रादुर्भाव असल्याने पिके संकटात सापडली आहेत. या अळीला नष्ट करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न शेतकरी करीत असून, त्यावर महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनसुद्धा अळ्या कमी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. पाऊस नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे; मात्र याकडे मात्र कृषी विभाग डोळेझाक करत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज आहे; मात्र कृषी विभागाचे एकही अधिकारी परिसरात येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. वाढते तापमान त्यामुळे पिकावर अळीची मोठय़ा प्रमाणात होणारी वाढ, यासंबंधित कृषी विभागाने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून यावर उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात, दुष्काळात पिके उद्ध्वस्त चांडोळ: जिल्ह्यासह तालुक्यात वन्य प्राण्यांचे हल्ले, पिकांची नासधूस अशा हल्लामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. शासनाने या वन्य प्राण्यांमुळे होणार्‍या शेतकर्‍यांच्या पिकांवर तसेच होणार्‍या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात वन्य प्राण्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढतच आहे. करडी (धाड) येथील शेतकरी प्रदीप शंकर तायडे यांच्या सावळी शिवारातील गट नं. १११ या शेतातील मका पिकाची जंगली रोही व रानडुकरांनी जवळपास एक एकर शेतातील मका या पिकाची नासधूस केली आहे. तसेच परिसरातील शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान केले आहे. तसेच परिसरातील रुईखेड, चांडोळ, भडगाव, मोहज, सैलानी, सावळी, ढालसावंगी, खोर अशा अनेक गावांचे शेतकरी वन्य प्राण्यांच्या नासधुसीमुळे त्रस्त झाले आहे. गेल्या तीन ते चार वर्षांंपासून शेतकर्‍यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यात अशा स्थितीत पिकांचे मोठे नुकसान वन्य प्राणी करीत आहे. पिकांना वन्य प्राण्यांच्या तावडीतून वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना कसरत करावी लागत आहे. अनेक शेतकरी रात्रभर जागून पिकांचे संरक्षण करतानाचे चित्र दिसत आहे. तरी संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांच्या या गंभीर प्रशासनाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.