शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील साहित्य लंपास करणारी टोळी सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 12:16 IST

Crime News बोथाकाजी व शिर्ला नेमाणे या दोन गावातील शाळांमधील इलेक्टॉनिक वस्तूंची चोरी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांमधील साहित्य लंपास करणारी टोळी सक्रीय असून, बोथाकाजी व शिर्ला नेमाणे या दोन गावातील शाळांमधील इलेक्टॉनिक वस्तूंची चोरी झाली आहे.तालुक्यातील बोथाकाजी येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून एलईडी टीव्हीसह इतर साहित्य असा १८ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी घडली होती. त्यानंतर आता पुन्हा शिर्ला नेमाणे येथील जी. व्ही. मेहता गुप्तेश्वर माध्यमिक विद्यालयात चोरी झाली. या शाळेतील अज्ञात चोरट्याने चार खोल्याचे कुलुप तोडून ७२,७५० रूपयांचे साहीत्य लंपास केल्याची तक्रार हिवरखेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, सध्या कोरोणा विषाणुचा संसर्ग सुरुअसल्याने सर्व शिक्षक व मुख्याध्यापक इयत्ता पाचवी ते दहावीचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहे. ऑनलाईन क्लासेस घेण्यासाठी शाळेत संगणक, प्रोजेक्टर व इतर आवश्यक साधन सामग्री आहे. शाळेच्या सुरक्षेसाठी सीसी कॅमेरे लावण्यात आले आहेत. दररोज कामकाज आटोपल्यानंतर दुपारी २.३० वाजता शाळा बंद करण्यात येते. शाळेच्या आजूबाजूला लोकांची वस्ती असल्याने रात्री उशीरापर्यंत वर्दळ असते. १७ मार्च रोजी शाळा उघडतेवेळी शाळेच्या चार खोल्यांचे कूलप तोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खोल्यांमध्ये पाहणी केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. बोथाकाजी येथेही शाळेत चोरी झाली होती. या घटनेची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख सादिक शेख रशीद, माजी उपसरपंच शेख कडू , शिक्षक मो . हुसैन मो. आजम यांनीही पाहणी केली. अज्ञात चोरट्याने ही चोरीे केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये मुख्याध्यापक यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेचच शिर्ला नेमाणे येथेही चोरी झाली आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. याचा फायदा घेऊन चोरी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी