शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात अट्टल चोरटा जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 14:04 IST

आलिशान कारमधून संयशास्पद रित्या फिरत असताना शहर पोलिसांनी या अट्टल चोरट्यास अटक केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ७० पेक्षा अधिक चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या एका अट्टल चोरट्यास गुन्हे शोध पथकाने मंगळवारी रात्री जेरबंद केले. शहरात चोरीच्या उद्देशाने एका आलिशान कारमधून संयशास्पद रित्या फिरत असताना शहर पोलिसांनी या अट्टल चोरट्यास मोठ्या शिताफीने अटक केले. खामगाव शहरातील चांदे कॉलनीतील लंबोदर अपार्टमेंट मधील विरेंद्र सुभाष दीपके यांच्या घरी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी चोरी झाली होती. यामध्ये सोने, चांदीच्या नाण्यांसह गॅस सिलेंडर आणि रोख रक्कमेसह ४० हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला होता. ही चोरी करताना रशीद शहा हमीद शहा(तलवारसिंह) सीसी कॅमेऱ्यात आढळून आला होता. दरम्यान, १० नोव्हेंबर २०१९ रोजी डीबीरोडवरील समर्थ अपार्टमेंट मधील सचिन रमेश कोष्टी यांच्या घरी झालेल्या १ लाख ६१ हजार ८५० रुपयांच्या चोरीमध्येही रशीदशहा हमीदशहा उपाख्य तलवारसिंह याचा सहभाग होता. चोरीच्या या दोन्ही घटनांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. दरम्यान, गोपनिय माहितीवरून शहर पोलिसांनी रशीदशहा हमीद शहा यास मंगळवारी रात्री खामगाव शहरातील ताज नगरातून ताब्यात घेतले. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची व्यूहरचना!अट्टल चोरटा खामगावात येत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी केली.  त्यानंतर शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर, गुन्हे शोधपथकाने रविंद्र लांडे, संतोष वाघ, रविंद्र वानखडे, संदीप टाकसाळे, दीपक राठोड, सूरज राठोड, गजानन काकडे, संजय इंगळे, गजानन हिवाळे, शेळके आदींनी अतिशय शिताफीने ही साखळी मोहिम फत्ते केली.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी