शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

क्रिकेटर अनेक होतील, पण दुसरा सचिन होणे नाही -  मार्क्स स्कुटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 18:20 IST

मुंबई येथील बीसीसीआयचे पंच मार्कस् स्कुटो हे आले होते. दरम्यान, मार्कस स्कुटो यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सचिन तेंडुलकर व क्रिकेट जगतातील अनेक अनुभवांना उजागर केले... 

- ब्रम्हानंद जाधव ।  बुलडाणा : आॅस्ट्रेलीयाचा खेळाडू बेड्रॉक ने जेंव्हा सचिन तेंडुलकर यांची विकेट घेतली, तेंव्हा ब्रॅड हॉगने सचिनला त्याच्या बॉलवर स्वाक्षरी मागितली. त्यावेळी सचिनने यापुढे मी तुझ्याकडून कधीच आऊट होणार नाही, असा शेरा त्या बॉलवर दिला, यासह सचिनच्या काही खास प्रसंगांना उजाळा देत क्रिकेटर अनेक होतील, पण् दुसरा सचिन होणे नाही, असे मत सचिनचे मित्र तथा बीसीसीआयचे पंच मार्क्स स्कुटो यांनी व्यक्त केले. बुलडाणा येथे राज्यस्तरीय स्क्वेअर क्रिकेट स्पर्धा ७ डिसेंबर पासून सुरू झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुंबई येथील बीसीसीआयचे पंच मार्कस् स्कुटो हे आले होते. दरम्यान, मार्कस स्कुटो यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सचिन तेंडुलकर व क्रिकेट जगतातील अनेक अनुभवांना उजागर केले... 

सचिन तेंडुलकर यांना  केंव्हापासून ओळखता?सचिन हा १२ वर्षाचा होता, तेव्हापासून त्याला मी ओळखतो. तो व माझा लहाना भाऊ सोबतच क्रिकेट खेळाचे त्यामुळे माझ्या लहान्या भावासोबत सचिनचे नेहमी घरी येणे-जाणे असायचे. त्यानंत मी स्वत: क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम करण्यास सुरूवात केली. त्यामुळे सचिनशी जास्त संपर्कात होतो. 

सचिनच्या मॅचमध्ये आपण पंच म्हणून होता का?  मुंबईची मॅच असेल, तर त्याठिकाणी मुंबईचाच पंच ठेवला जात नाही. अशावेळी दुसरीकडील पंच बोलाविण्यात येतात. परंतू सचिनच्या लोकल मॅचमध्ये पंच म्हणून बºयाच वेळा राहिलो. मोठ्या मॅचमध्ये पंच म्हणून राहण्याची तशी संधी आली नाही.  

 विकेट पडल्यानंतर सचिन काय करायचे? विकेट पडल्यानंतर सचिन कधीच एकदम रिअ‍ॅक्ट होत नसे. परंतू मैदानातून आत गेल्यानंतर नेमकी विकेट कशामुळे पडली, आपली काय चूक झाली, याचा बारकाईने विचार करायचा. पुन्हा तीच चूक होणार नाही, याची खबरदारी तो घेत असे.

ग्रामीण भागातून मोठा क्रिकेटर समोर न येण्यामागची काय कारणे?   ग्रामीण भागातूनही चांगला खेळाडू समोर येऊ शकतो. परंतू मुंबई सारख्या शहरामध्ये ज्या वेळोवेळी लोकल मॅच होतात, तशा ग्रामीण भागात किंवा छोट्या शहरामध्ये होताना दिसत नाहीत. या लोकल मॅचमधूनच अनेक मोठे खेळाडू जन्माला येतात. ग्रामीण भागातही असे खेळाडू असतात, परंतू त्यांना पहिजे त्या सुविधा व्यासपीठ उपलब्ध होत नाही. खेळातील सातत्य कमी होते, प्रशिक्षकांचा अभाव असतो. शहरातील क्लबमधूनही अनेक खेळाडून मोठे होतात.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSachin Tendulkarसचिन तेंडुलकर